आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netaji Subhashchandra Bose Didnot Die In Air Crash Government Would Release Secret Files Relating

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अपघाती मृत्यु नव्हे तर हत्याच; सुब्रह्मण्यम स्वामींचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज (शनिवारी) खळबळजनक दावा केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला नव्हता. रशियाचे नेते जोसफ स्टालिन यांच्या इशार्‍यावरून नेताजींची हत्या करण्‍यात आल्याचा धक्कादायक खुलासा स्वामींनी केला आहे. स्टालिनने नेताजी यांना सायबेरियात बंदी बनवण्यात आले होते. नंतर 1953 मध्ये त्यांची हत्या केली, असे स्वामी यांनी कोलकातामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले.

'मर्चेंट चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज'च्या एका कार्यक्रमात स्वामी संबोधित होते. देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना या विषयी संपूर्ण माहिती होती. नेताजींना बंदी बनवून त्यांना सायबेरिया याकुत्सतील तुरुंगात ठेवण्यात आले होते. नंतर त्यांची हत्या करण्यात आली. केंद्र सरकार लवकरच नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील फाईल्स सार्वजनिक करणार असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
पंदप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण स्वत: नेताजींच्या मृत्यूसंदर्भात चर्चा करणार आहे. तसेच गोपनिय दस्ताऐवज ब्रिटन आणि रशियाला सार्वजनिक करण्याची मागणी करणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूप्रकरणी तपास करणार्‍या मुखर्जी आयोगाला अमेरिकेने एक पत्र पाठवले होते. तैवानमध्ये कोणताही विमान अपघात झाला नसून तेथील कोणत्याही रुग्णालयात जळालेल्या मृतदेहांचा अहवाल आढळलेला नसल्याचे या पत्रात म्हटले होते, असे स्वामी यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, 1941 मध्ये ब्रिटिश सरकारने नेताजींना कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी नजरकैद केले होते. मात्र, तेथून पलायन करून अनेक देशांचा दौरा केला. जपानच्या सहकार्याने इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली. 1945 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस बेपत्ता झाले आहेत.