आझमगड (यूपी)- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील एक नवीन खुलासा समोर आला आहे. नेताजींचे ड्रायव्हर आणि त्यांचे सर्वात निकटवर्तीय राहिलेले कर्नल निजामुद्दीन यांनी 116 व्या वर्षी बॅंकेचे अकाउंट उघडले. त्यांनी रविवारी वयाचे 116 वर्ष 3 महीने आणि 14 दिवस पूर्ण केले आहेत. 107 वर्षांच्या पत्नीसोबत संयुक्त खाते....
- विशेष म्हणजे कर्नल निजामुद्दीन यांच्या पत्नी अजबुनिशा यांचे वय 107 वर्ष आहे.
- दोघांनी एसबीआयमध्ये संयुक्त खाते उघडले आहे.
- स्थानिक लोकांनी आणि जिल्हा प्रशासनाने कर्नल निजामुद्दीन यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर समाधान व्यक्त केले.
- नेताजींसोबत राहिलेले ज्येष्ठ आपल्या परिसरात राहतात याबाबत लोकांनी समाधान व्यक्त केले.
कर्नल निजामुद्दीन जगातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती..
- आझमगडच्या मुबारकपूरमध्ये राहणारे कर्नल निजामुद्दीन उर्फ सैफुद्दीन यांनी त्यांचे बँक अकाउंट उघडले.
- येथे त्यांनी पुराव्यासाठी मतदान कार्ड आणि पासपोर्ट दिला आहे.
- बँकेकडील कागदपत्रांकडून त्यांचा जन्म 1900 मध्ये झाला आहे.
- याच वर्षी एक जपानी ज्येष्ठ ज्यांना जगातील सर्वात वयस्कर मानले जात होते त्यांचे वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले.
- त्यामुळे आता कर्नल निजामुद्दीन सर्वात वयस्कर मानले जातात.
निजामुद्दीन यांनी सांगितले होते नेताजींबाबतचे फॅक्ट्स
- काही दिवसांपूर्वी निजामुद्दीन यांनी नेताजींबाबत काही महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या होत्या.
- आजही नेताजींबाबत बोलताना त्यांचे डोळे भरून येतात.
- त्यांच्या माहितीनुसार, ब्रह्मदेशात छितांग नदीजवळ 20 ऑगस्ट 1947 ला त्यांनी नेताजींना सोडून दिले होते. हीच त्यांची शेवटची भेट.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कर्नल यांचे फोटो....