आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवजात बालकास मिळणार जन्माबराेबरच युनिक अायडी, मध्य प्रदेशातही करणार सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाेपाळ - मध्य प्रदेशातील सर्व प्राथमिक अाणि सार्वजनिक अाराेग्य केंद्र अाणि जिल्हा रुग्णालयांत जन्म नाेंदणी प्रणाली लागू केली जाणार अाहे. यामुळे जन्म हाेताच बालकाचे नाव अाधार क्रमांकासाठी नाेंदवले जाणार अाहे.
हरियाणाच्या धर्तीवर मध्य प्रदेशातील अाराेग्य खाते लवकरच ही प्रणाली अमलात अाणली जात अाहे. भारतीय विशिष्ट अाेळख प्राधिकरणाने अाराेग्य मंत्रालयाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठवला हाेता. राष्ट्रीय अाराेग्य माेहिमेचे संचालक कृष्ण गाेपाल राव यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, यासंदर्भात एमपी इलेक्ट्राॅनिक डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन साेबत करार करण्यात अाला असून रुग्णालयांमध्ये टॅब्लेटच्या माध्यमातून बालकांची ‘अाधार’ साठी नाेंदणी केली जाणार अाहे. पायलट प्राेजेक्टच्या रूपात ही याेजना भाेपाळमध्ये तीन महिने चालवली जाणार अाहे. त्यानंतर जिल्हा अाणि सार्वजनिक अाराेग्य केंद्रात लागू केली जाणार अाहे.

मध्य प्रदेशातील सर्व रुग्णालये अाणि प्रसूतिगृहांमध्ये मिळून दर महिन्यास साधारणपणे १ लाख मुले जन्मास येतात. जिल्हा रुग्णालय अाणि सार्वजनिक अाराेग्य केंद्रातील ही संख्या सुमारे ६० हजार इतकी अाहे.

मुलांची अदलाबदल करण्याचे टळेल
नवजात मुलांची अाधार नाेंदणी झाल्यामुळे त्याच्या अदलाबदलीच्या घटनांना पायबंद बसेल, अशी अाशा व्यक्त केली जात अाहे. नवजात बालक अाणि अाई-वडिलांचे फिंगर प्रिंट अाणि अायरिश स्कॅननंतर नाेंदणी हाेताच अायडी बनेल त्यामुळे अदलाबदली अाणि बालकावर हक्क दाखवण्याच्या घटना राेखणे शक्य हाेणार अाहे.

अशी असेल प्रक्रिया
बालकाचा जन्म हाेताच तिथे उपस्थित कर्मचारी टॅब्लेटद्वारे माता अाणि पित्याचे बायाेमेट्रिक डेटा अर्थातच फिंगरप्रिंट अाणि अायरिश स्कॅनिंग करतील त्यांचे नाव, पत्ता, माेबाइल क्रमांक, ई-मेल अायडीसह सर्व अावश्यक माहिती घेऊन फाॅर्म भरतील त्यानंतर बालकाचा नाेंदणी क्रमांक जनरेट हाेईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच बालकास अाधार क्रमांक मिळेल.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...