आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री झुडपांतून येत होता आवाज, सकाळी समोर आले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुडपामागे नवजात अर्भक आढळले. - Divya Marathi
झुडपामागे नवजात अर्भक आढळले.
इंदूर - झाबुआच्या कल्याणपुरा परिसरातील एजनपुरा गावात तलावाच्या काठी शनिवारी सकाळी एक नवजात अर्भक आढळले. त्याला जिल्हा रुग्णालयात एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. बालरोग तज्ज्ञांच्या मते, चिमुकल्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला सुपरव्हिजनमध्ये ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री मुलाचा आवाज ऐकून महिलेने जेव्हा लोकांना बोलावले, तेव्हा तो आवाज ऐकून सर्व जण तेथून पळून गेले. 
 
सकाळी महिलेला आढळले अर्भक...
- प्राप्त माहितीनुसार, गावात एक तलाव आहे. जवळच रूप मकवाना यांचे घर आहे. रूप यांची पत्नी मीरा रात्री 8 वाजता शेतात पाणी देत होत्या. यादरम्यान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, परंतु आसपास कोणीही दिसले नाही. यामुळे त्यांनी गावकऱ्यांना बोलावले. मुलाच्या रडण्याचा आवाज सातत्याने येत होता. यामुळे गावकरी घाबरले आणि सर्व जण आपल्या घरी परतले.
झुडपांच्या मागून येत असलेला आवाज ऐकून मीरा परतल्या, परंतु रात्रभर डोळा लागू शकला नाही. सकाळ होताच त्यांनी आपल्या पतीला कुणीतरी बाळ सोडून गेल्याचे सांगितले. यानंतर त्या पतीला घेऊन परत शेतात गेल्या. आसपास शोध घेतला तेव्हा तलावाच्या काठी शालीत गुंडाळलेले अर्भक आढळले. याची पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पंचनामा करून मीरा आणि त्यांच्या पतीने अर्भकाला रुग्णालयात नेले. येथे त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी एसएनसीयूमध्ये दाखल केले.
 
दीड किलो वजन, प्रकृती चिंताजनक
- जिल्हा रुग्णालयात शिशू रोग विशेषज्ञ डॉ. सचिन बावनिया यांच्या मते, नवजात बालक दोन ते तीन दिवसांचे आहे. त्याचे वजन 1 किलो 600 ग्रॅम असून खूप अशक्त आहे. यामुळे त्याची देखभाल अत्यंत गरजेची आहे. 
 
बाळाला दत्तक घ्यायचेय
- नवजात अर्भकाला जिल्हा रुग्णालयात घेऊन आलेल्या मीरा म्हणाल्या, त्यांच्या मुलाचे लग्न होऊन बरेच दिवस झाले, पण मूलबाळ नाही. म्हणून माझ्या मुलासाठी या बाळाला आम्ही दत्तक घेऊ. मग कितीही कडक कायदेशीर प्रक्रिया असली तरी आम्ही ती पार पाडू. गरज भासल्यास आमची प्रॉपर्टीही बाळाच्या नावे करून देऊ.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...