आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी पंडितांनाे, परत या, हिज्बुलचे आवाहन, नवा कमांडर झाकीरचा व्हिडिआे जारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मिरातील फुटीरवादी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनने खोऱ्यातून १९९० च्या आसपास जिवाच्या भीतीने पळून जाऊन विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परतण्याविषयी आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या घरात परतावे, त्यांना संरक्षण मिळेल तसेच आम्ही शीख युवकांचा एक ग्रुप स्थापन करण्याचेही नियोजन करत आहोत. त्यांनी हिज्बुल मुजाहिदीनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काश्मिरी पंडितांना त्या वेळी परिस्थितीमुळे खोऱ्यातून जावे लागले होते. त्यांना दहशतवादी संघटनांनी लक्ष्य केले होते. त्यामुळे सध्या राज्यातील हे पंडित जम्मू आणि देशाच्या इतर भागांत राहत आहेत. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीत थोडी सुधारणा असली तरी अशांतता कायम आहे.

आम्ही काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परतण्याचे आवाहन करत आहोत आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील घेत आहोत. त्यांनी पंडितांना पुढे असेही दाखवून दिले आहे की, काश्मीरमध्ये राहत असलेल्या सोडून न गेलेल्या इतर काश्मिरी पंडितांकडे पाहावे. त्यांना कुणी मारलेय का वा त्यांना कुणी जबरदस्ती केलीय का, असेही झाकीर रशीद भट उर्फ मुसा याने म्हटले आहे. तो स्वत:ला हिज्बुलचा कमांडर आणि सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेलेला हिज्बुलचा कमांडर बुरहान वानी यांचा वारसदेखील म्हणवतो. त्याने कालच जारी केलेल्या १.३८ मिनिटांच्या व्हिडिओ संदेशात असे जाहीर केले आहे.
ब्ल्यू स्टारसारख्या कारवाईचा विचार
या व्हिडिओ संदेशात झाकीर रशीद भट हा लष्करी गणवेशात हातगोळा (ग्रेनेड) हाताळताना दिसत आहे. रशीद भट हा एक बुद्धिमान विद्यार्थी असून पंजाबमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम अर्ध्यावरच सोडून अनेक वर्षांपूर्वीच हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत तो दाखल झालेला आहे. भट पुढे म्हणतो, केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कट करून पंडितांना खोऱ्यातून बाहेर काढण्यात आले. तसेच सध्या सरकार पंजाबमधील ब्ल्यू स्टार ऑपरेशनच्या धर्तीवर येथेही खोऱ्यात अशीच मिलिटरी अॅक्शन घेण्याचे नियोजन करत आहे, असाही आरोप केला.
बातम्या आणखी आहेत...