आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमए-बीएड सून बनली सरपंच, विजयाचा जल्लोष संपताच पोहोचली स्वयंपाक घरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - महिला सरपंच धापू बिंजायरिया.
जोधपूर - बोरानाडा ग्रामपंचायतीत विजय मिळवत सरपंच बनलेल्या धापू बिंजारिया केवळ 23 वर्षाच्या आहेत. सरपंचबदाच्या विजयाचा जल्लोष संपताच त्यांनी लगेचच घरी जात स्वयंपाक घरातील कामे सांभाळली. एमए-बीएडची पदवी मिळवल्यानंतर धापू शिक्षिका बनणार होत्या. पण पती भूराराम आणि वडील प्रेमाराम यांच्या सांगण्यावरून निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि प्रतिस्पर्ध्याला 321 मतांनी पराभूत करत विजयीही झाल्या.
ग्रामपंचायतीमध्ये रस्ते, पाणी, सीव्हरेजच्या समस्या दूर करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावाने सरपंचपदी निवडून आपल्याला मोठी जबाबदारी दिली असल्याचे त्या म्हणाल्या.

गावाच्या विकासाला प्राधान्य
दरम्यान पाल ग्राम पंचायतीत विजय मिळवणाऱ्या अनिता चौधरी यांनी गावाच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे म्हणाल्या आहेत. शिक्षणाची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. 24 वर्षीय अनिता दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांचे पती भागीरथ इंजिनिअर आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, जल्लोष संपताच सूनबाईंनी कामाला केली सुरुवात...