आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांबूच्या आैषधीनेे किरणोत्सर्गापासून बचाव, रेडिआेथेरपीच्या दुष्परिणामात ८० टक्क्यांनी घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद / गोंडल - कर्करोग उपचारासाठी रोगग्रस्त पेशींवर रेडिआेथेरपी केली जाते. गामा किरणांनी शेकून काढले जाते. यातून रोगग्रस्त पेशींवर उपचार केला जातो; परंतु त्याचा दुष्परिणाम आरोग्यासाठी लाभदायी असलेल्या पेशींवर नकळतपणे होताे. यापासून संरक्षण करण्यासाठी सिंथेटिक आैषधोपचार केला जातो; परंतु त्याचे साइड इफेक्ट होतात. मात्र, आता आरोग्यासाठी लाभदायी पेशींच्या संरक्षणासाठी बांबूची मदत घेतली जाणार आहे.

निरमा विद्यापीठातील चार संशोधकांनी यासंबंधीचा दावा केला आहे. बांबूच्या पानांमध्ये फ्लेव्हेनॉइट्स तत्त्व असते. यामुळे आरोग्य पेशींवरील दुष्परिणाम ८० टक्क्यांनी कमी होतो. हा प्रयोग फार्मास्युटिकल्स अॅनालिसिस विभागाचे प्रमुख डॉ. प्रीती महेता, डॉ. सोनल बक्षी, मानसी पटेल आणि शिखा तिवारी यांनी केला. डॉ. महेता म्हणाल्या, बांबूच्या पानांना उकळून फ्लेव्हेनॉइड्स काढून घेतले.

त्यानंतर रेडिआेथेरपी केल्या जाणाऱ्या रुग्णाच्या रक्तातील रेडिएशनचे आकलन करण्यात आले. नंतर रक्तात फ्लेव्हेनॉइड्स एकत्र करून पुन्हा रेडिएशन देऊन प्रक्रिया आणि परिणाम जाणून घेण्यात आले. त्यात दुष्परिणाम ८० टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. आता याच तत्त्वाला आधार बनवून आैषध निर्मिती केली जाणार आहे.

आजारी असल्याचे स्वीकारू नका : जोगी
सौराष्ट्रच्या गोंडल या छोट्या गावात राहणारे तुलसीदास जोगी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांना गेल्या वर्षी कर्करोग झाला; परंतु वर्षभरात ते त्यातून बरे झाले. आैषधी होतीच; परंतु सर्वाधिक फायदा झाला तो त्यांच्या इच्छाशक्तीचा आणि कुटुंबीयांनी दिलेल्या मदतीचा. ऑगस्ट २०१४ मध्ये एके दिवशी घरी पाेहोचल्यानंतर त्यांना खूप थकल्यासारखे वाटले. त्यांचे थोरले भाऊ डाॅ. नवनीत यांना धाकट्या भावाला काही तरी संशय आला. त्यानंतर तपासणी झाली. त्यात ४७ वर्षीय जोगी यांना मल्टिपल मायलोमा असल्याचे निदान झाले. हा एक प्रकारचा रक्ताविषयी कर्करोग आहे; परंतु त्यांना कोणीही कर्करोग झाल्याचे सांगितले नाही. मात्र, एक दिवस त्यांनी आपला वैद्यकीय अहवाल पाहिला. त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात आल्या; परंतु त्यांनी हिंमत हरली नाही. कर्करोग मला काय पराभूत करेल. मीच त्याच्यावर मात करीन. आता हीच गोष्ट कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपलीच हकिगत सांगत असतो.
बातम्या आणखी आहेत...