आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळगोपाळांना आता देशभरात मिड डे मिल्क, ग्रामविकास मंत्रालयाचे सर्वेक्षण सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - सरकारी शाळांत आता मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना गायीचे दूध दिले जाईल. ग्रामविकास मंत्रालयाने यासाठी देशभरातील शाळांत सर्वेक्षण करण्यास प्रारंभ केला आहे. मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना टेट्रापॅक मिल्क (देशी गायीचे दूध) देण्यामागे त्यांची कुपोषणातून मुक्तता व स्मरणशक्ती वाढावी, असा विचार आहे.

दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय गोवंश विकास संघटनेच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. तसेच संघटनेकडून सल्लेही मागवले होते. राजस्थानातून त्यात संघटनेचे राष्ट्रीय संयोजक व राजस्थान गोसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंह राजपुरोहित सहभागी झाले होते. त्यांनीच हा प्रस्तावही मांडला होता. यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने शाळांत सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.

असे होणार दुधाचे वितरण
सरकारी डेअर्‍यांत गायीच्या दुधाचा पुरवठा केला जाईल. तेथून ते शाळांत पोहोचवले जाईल. शाळकरी मुलांच्या संख्येकडे बघता दुधाचे वितरण केले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळेल.