आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या आमदारांसाठी नव्या पक्षाची दारे खुली- सुभाष वेलिंगकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - भाजपमधील काही आमदार पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत. त्यांच्यासाठी आपल्या आगामी राजकीय पक्षाची दारे खुली असतील, असे आवाहन भारतीय भाषा सुरक्षा मंचचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे. अनेक आमदारांना त्यांचा विवेक पक्षात राहू नको, असे बजावत आहे. कारण पक्षात काही बाबतीत सहमती होताना दिसून येत नाही. त्यामुळेच अशा आमदारांनी हिंमत दाखवून आमच्या सोबत यायला हवे. आमची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करू, असे वेलिंगकर म्हणाले. रविवारी भाषा सुरक्षा मंचच्या तालुका-जिल्हा स्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. मी संघाचा शिस्तप्रिय स्वयंसेवक आहे, या संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वक्तव्याचाही वेलिंगकर यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री असताना पर्रीकर यांना आपण केलेली कृती योग्य वाटत असल्यास ते पूर्णपणे अयोग्य आहेत. त्यांना वाटतात ते शिस्तशीर आहेत. परंतु आम्ही त्यांच्या शिस्तीच्या विरोधात आहोत. वेलिंगकर यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्यावरही टीका केली. गोव्याच्या विधानसभेनंतर पारसेकर यांची कवच कुंडले जातील, असे भाकीतही वेलिंगकर यांनी केले आहे.

निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित
गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चितपणे होणार आहे, असा दावा वेलिंगकर यांनी पूर्वीच केला. एमजीपीशी युतीबाबतचा निर्णय २७ सप्टेंबरच्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

निदर्शने सुरूच, आणखी तीव्र करणार
राज्याच्या शिक्षणक्रमात प्राथमिक वर्गाचा अभ्यास मातृभाषेतून असावा, यासाठी वेलिंगकर यांची संघटना आग्रही अाहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. ते आणखी तीव्र हाेणार आहे. सध्या सुरू असलेल्या निदर्शनांत २० टक्के स्वयंसेवक तर ८० टक्के सामान्य नागरिकांचा सहभाग आहे, असा दावा वेलिंगकर यांच्याकडून करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...