आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: दंडाला यंत्र न बांधता, सुई न टोचवता शुगर टेस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- सुरुवातीला ही चाचणी थोडी त्रासदायक असायची. अनेक सुया टोचून रक्ताच्या चाचण्या घेतल्या जात होत्या. आता एक यंत्र आले आहे. ते दंडाला बांधतात, त्यात असलेल्या सेन्सरद्वारे प्रत्येक तासाला शुगरची चाचणी केली जाते. शरीरातून रक्त न काढणाऱ्या या यंत्राची यशस्वी चाचणी झाल्यानंतर याचा वापर सुरू झाला आहे. वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेल्या मधुमेही रुग्णांच्या विविध चाचण्या केल्या जातात. काही रुग्णांची ४८ तासांची  शुगर तपासली जाते. परंतु बहुतांश प्रकरणांत हे यंत्र ७ ते १५ दिवसांपर्यंत शुगरचे निरीक्षण करते.  


हृदयासाठी घातक
दिवसातून अनेक वेळा शुगर वाढणे व कमी होणे हृदयासह अनेक अवयवांसाठी घातक ठरू शकते. अशा वेळी जीव्ही टेस्ट करणे हृदयरुग्णांसाठी खूप उपयुक्त ठरते.  


शुगरचे चढ-उतार शोधणे अवघड 
जालंधरच्या न्यू रुबी रुग्णालयाचे डॉ. एसपीएस ग्रोव्हर यांनी म्हटले, अनेकदा फास्टिंग शुगर योग्य असते व रक्तदाबही योग्य असतो. परंतु रुग्णाला अस्वस्थ वाटते. संशोधनांती असे समजले की, अशा रुग्णांची  शुगर ग्लायसेमिक व्हेरिअॅबिलिटीमध्येच दिसते. अनेक रुग्णांची शुगर दिवसातून अनेक वेळा चढत व उतरत असते. याची काही खास लक्षणे दिसून येत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...