आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Turn In Babri Case, Hashmi Ansari Withdrawal Himself From Case

बाबरी वादाला नवी कलाटणी, ५३ वर्षांपासून खटला लढवणारे हाशीम अन्सारी यांची माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्या/ लखनऊ - रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाला बुधवारी नवीन कलाटणी मिळाली. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर २२ वर्षांनी या प्रकरणात मुस्लिमांची बाजू मांडणारे सर्वात जुने पक्षकार मोहम्मद हाशीम अन्सारी यांनी आता हा खटला न लढवण्याची घोषणा केली आहे. बाबरी प्रकरणाचे राजकारण करण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या अन्सारी यांना आता रामलल्ला मुक्त झालेला पाहायचा आहे. सहा डिसेंबरला बाबरी विध्वंसदिनी आपण कोणताही कार्यक्रम करणार नाही. घराचे दार बंद करून आतच बसून राहीन, असेही त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे समझोत्याचा मसुदा तयार होता मात्र विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल आणि भाजपचे विनय कटियार यांनी त्यात खोडा घातल्याचे आखाडा परिषदेचे महंत ज्ञान दास यांनी म्हटले आहे.

मोदी मुस्लिमांचे कैवारी : नरेंद्र मोदींना आमच्या जातीची काळजी आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. राजकारण करणारे सरकारचा पैसा घेऊन फायदे लाटतात मात्र मोदी खासदार, आमदारांना एक- एक पैशांचा हिशेब मागतात. ते चांगले व्यक्ती आहेत, असे हाशीम अन्सारी यांनी म्हटले आहे.
दोन्ही बाजूंच्या वकिलांचे मत - फरक पडणार नाही
बाबरी मशीद अॅक्शन कमिटीचे संयोजक जफरयाब जिलानी म्हणाले की, अन्सारी नाराज असावेत. बहुधा त्यांच्यापर्यंत खटल्याची माहिती जात नसावी. त्यांना ऐकू येण्यात काही अडचणी आहेत. अन्सारींनी अपील मागे घेतले तरी काही फरक पडणार नाही. कारण ते एकटेच वादी नाहीत. मुस्लिमांची बाजू मांडणारे वकील हाजी महबूब म्हणाले की, अन्सारी तर १९६१ मध्ये वादी झाले होते. त्यांच्यासारखे १० जरी आले तरी खटल्यावर काहीही फरक पडणार नाही.
अयोध्या खटल्यातील निर्मोही आखाड्याचे वकील रणजीत लाल यांनी सांगितले की, खटला १९४९ मध्ये सुरू झाला होता.
त्यावेळी जहूर मोहम्मद आणि सलार मोहम्मद खटल्यासाठी जात होते. दोघेही त्याच भागात राहत होते. सुन्नी बोर्ड ऑफ वक्फने १९६१ मध्ये खटला दाखल केला होता. हाशिम तेव्हा १९ वर्षांचे होते. त्यावेळी खटला लढवणाऱ्यांनी ‘याला वादी क्रमांक ७ करा,’असे म्हटले. ते आज खटला सोडत असले तरी काहीही फरक पडणार नाही. अन्सारी खटल्यातून बाहेर पडले तरी काही फरक पडणार नाही. आता हे प्रकरण जनहिताचे आहे. अशा परिस्थितीत दुसरी
कोणतीही व्यक्ती हा खटला लढू शकते.
- आर. एस. गर्ग, निवृत्त मुख्य न्यायमूर्ती, गुवाहाटी उच्च न्यायालय

६५ वर्षांपासून न्यायालयात खटला
अयोध्या खटला १९४९ पासून सुरू आहे. १९६१ मध्ये अन्सारी वादी बनले. २०१० मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला. ३ पैकी २ न्यायमूर्तींनी वादग्रस्त जागेच्या तीन भागात वाटणीस मान्यता दिली होती. भाजप अन्सारी यांनी वस्तुस्थिती स्वीकारली आहे. काही लोकांनी हेतुत: मुद्दा वादग्रस्त केला, असे खासदार योगी आदित्यनाथ म्हणाले.

काँग्रेस अन्सारी यांच्यावर संघ आणि भाजपच्या लोकांनी दबाव टाकला, असे काँग्रेस नेते पी.एल. पुनिया म्हणाले.

सप अन्सारी यांच्या आरोपांमुळे फरक पडत नाही. निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे, अन्सारींना नव्हे, असे समाजवादी पक्षाच्या नेत्या सुमन यादव म्हणाल्या.

हाशीम यांची नाराजी कशामुळे ? : आझम यांनी यापूर्वी म्हटले होते की, ज्या दिवशी बाबरी मशिदीचा विध्वंस झाला त्याच दिवशी मंदिर झाले होते. आता फक्त द्वेष पसरवला जात आहे. हाशीम यांच्या मते द्वेष आणि फायद्याचे काम फक्त आझमच करत आहेत. ते जर चित्रकूटमध्ये ६ मंदिरांचे दर्शन घेऊ शकतात तर अयोध्येत का येत नाहीत?

नेते बंगल्यांत, रामलल्ला बंदिस्त! आता असे होणे नाही
अन्सारी म्हणाले, रामलल्ला स्वतंत्र झाल्याचे मला पाहायचे आहे. नेते बंगल्यांत आणि रामलल्ला बंदिस्त, असे का? नेते झालेले लोक मलई खात आहेत आणि रामलल्लाला विलायचीचे दाणे देत आहेत.

आझम यांनी खटला लढवावा
अन्सारी म्हणाले की, आझम खान धर्माशी द्रोह करत आहेत, हे मुस्लिमांना सांगेन. बाबरीची बाजू मांडण्यासाठी कृती समिती बनवली होती, पण आझम खान यांना संयोजक बनवले. त्यांनीच खटला लढवावा. नेत्यांमुळे आता प्रलय होईपर्यंत तोडगा निघणे कठीण स्वातंत्र्यानंतर जेव्हापासून मूर्ती ठेवण्यात आली तेव्हापासून पाहत आहे. राम जन्मभूमी -बाबरी मशिदीवर हिंदू -मुस्लिम नेते पोळ्या भाजत आहेत. नेत्यांमुळे या मुद्द्यावर प्रलय होईपर्यंत तोडगा निघेल, असे वाटत नाही. हिंदूंमध्ये आम्ही अपमानित हाशीम म्हणाले, खटला आम्ही लढवायचा. त्रास आम्ही सहन करायचा आणि बाबरीच्या नावावर लोक मंत्री झाले आहेत.
आझम, मुलायम, अडवाणी, सिंघल या सर्वांनी या वादाचा उपयोग फायद्यासाठीच केला.