आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसूतीवेळी सूनेला जनावरांप्रमाणे मारझोड, 10 मिनिटांच्या नवजात बाळाला फरशीवर आपटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ (उत्तर प्रदेश) - सीतापूर येथील विवाहितेच्या 10 मिनीटांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला फरशीवर आपटून मारुन टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 2 ऑक्टोबर रोजी महिलेच्या बाळांतपणावेळी कुटुंबीयांनी तिचा अनन्वित छळ केला. अवघडलेल्या अवस्थेतील महिलेला एवढी मारहाण करण्यात आली की तिची कंबर मोडली. कुटुंबीयांनी डिलिव्हरीसाठी तिला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी एका गुप्त रुममध्ये नेले आणि बळजबरी दोन टेबलवर झोपवले.
पीडितेने केले हे आरोप
- पीडित महिलेचा आरोप आहे की प्रसव वेदना होत असतानाही तिला मारहाण सुरु होती.
- पीडितेने पती आणि सासरचे लोक हुंड्याची मागणी करत असल्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच बळजबरी गर्भपात करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
- पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सासरच्या 8 जणांविरोधात 498ए, 315, 506, 3/4 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
- सीतापूरचे पोलिस आयुक्त सौमित्र यादव म्हणाले, की सर्व आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सासरच्या लोकांनी कशासाठी केला ऐश्वर्याचा एवढा छळ
बातम्या आणखी आहेत...