आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 दिवसांच्या बाळाच्या नाभीतून निघताहेत अळ्या, पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - महिला रुग्णालयाच्या एसएनसीयूमध्ये शनिवारी रात्री सीरियस कंडिशनमध्ये एका 6 दिवसांच्या नवजात बाळाला अॅडमिट करण्यात आले. या बालकाच्या नाभीतून अळ्या निघताहेत. डॉक्टर या प्रकाराला जन्मजात आजार सांगत आहेत. डॉक्टर्सचे म्हणणे आहे की, पहिल्यांदाच अशी केस समोर आली आहे. बाळाची प्रकृती पाहून इंदूरला रेफर करण्यात आले आहे. यानंतर मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटले की, बाळ बर्म अमलायकल मायसिस आजाराने ग्रस्त आहे.
 
असे आहे प्रकरण...
- एसएनसीयूकडून मिळालेल्या माहितीनुसार धार जिल्ह्यातील अवरालचा राहणारा संजू सोहन भिलाला यांच्या पत्नीने मनावर रुग्णालयात 10 ऑक्टोबर रोजी मुलाला जन्म दिला होता.
- रुग्णालयातून सुटी झाल्यावर ते घरी गेले होते. कुटुंबीयांनी सांगितले की, शनिवारी बाळाच्या नाभीची नाळ तुटली. रक्त वाहिल्यावर कुटुंबीयांनी पुन्हा बाळाला रुग्णालयात नेले.
- येथे ड्रेसिंग करताना अळ्या निघाले म्हणून बाळाला बडवानी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
 
आईकडून बाळाला होतो हा आजार...
- एसएनसीयूचे शिशु रोग विशेषज्ञ डॉ. तरुण वास्कले म्हणाले, हा जन्मजात आजार आहे. हा आजार आईकडून बाळाला संक्रमित होत असतो.
- ते म्हणाले की, या प्रकारच्या अळ्या घाणीत राहणाऱ्या गुरांच्या शरीरात आढळतात.
- यांचे संक्रमण मटण, मांस खाल्ल्याने अथवा गलिच्छ जागेच्या जास्त संपर्कात राहिल्याने आईच्या शरीरात प्रवेश करतात. जे बाळाच्या शरीरात पोहोचतात.
- कधी-कधी या अळ्या मेंदूपर्यंतही पोहोचतात. तथापि, याच्यावर उपचार शक्य आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित बातमीचे आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...