आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Newly Appointed Governor Kalyan Singh To Take Oath On Thursday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कल्याण सिंहांच्या राज्यपाल पदाच्या शपथग्रहण सोहळ्यात समर्थकांचे \'जय श्री राम\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : शपथ घेताना राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल कल्याण सिंह.

जयपूर - राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल कल्याण सिंह यांनी गुरुवारी दुपारी राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली. यावेळी शपथविधी सोहळ्यात त्यांच्या समर्थकांनी जय श्री राम ची घोषणाबाजी केली. याबाबत विचारणा केली असता, यात वाईट काय आहे? अशी विचारणा कल्याणसिंह यांनी केली.

कांग्रेसची टीका
शपथग्रहण सोहळ्यात झालेल्या घोषणाबाजीवर काँग्रसने टीका केली. काँग्रेस नेत्या गिरिजा व्‍यास म्हणाल्या की, सरकारी कार्यक्रमाला काही लोक धार्मिक रंग देण्याचा प्रकार करत असून हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. कल्याणसिंह एक संविधानात्मक पद ग्रहण करणार आङेत. त्यामुळे त्यांनी राजकारणापासून दूर रहायला हवे, असे मत गिरीजा यांनी व्यक्त केले.

लक्ष्‍मणरेषा पार करणार नाही : कल्‍याण सिंह
शपथविधीनंतर कल्याणसिंह म्हणाले की ते स्पर्धक म्हणून नव्हे तर सहकारी बनून आले आहेत. आपण कधीही लक्ष्मण रेषा ओलांडणार नाही, असेही कल्याणसिंह म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. वाजपेयी यांनी भारतीय राजकारणाला एक नवे वळण दिले असे कल्याणसिंह म्हणाले.
पुढील स्लाइडवर पाहा, पत्रकार परिषदेचे फोटो...