आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या नवरीला नवऱ्याने बेल्टने मारले, शरीरावर उमटले असे वळ; पोलिसांवर नेत्यांचा दबाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवऱ्याचे भारतीय जनता पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये उठबस असल्यामुळे पोलिस त्याच्या विरोधात कारवाई करत नाही. - Divya Marathi
नवऱ्याचे भारतीय जनता पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये उठबस असल्यामुळे पोलिस त्याच्या विरोधात कारवाई करत नाही.
चंदीगड - मोहालीत पतीने नव्या नवरीला बेल्टने मारण्याचे प्रकरण समोर आले आहे. पतीची ही क्रूरता पत्नी गेल्या काही दिवसांपासून सहन करत होती. एक महिन्यापूर्वीच मॅट्रोमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून दोघांचे लग्न झाले होते. विवाहानंतर काही दिवसांतच पतीने पैशांची मागणी सुरु केली. पैसे मिळत नाही म्हणून तो पत्नीला बेदम मारहाण करत आहे. महिलेने पोलिसात तक्रार केली मात्र कारवाई काहीच झाली नाही. तेव्हा महिलेने उपमुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर कॉल करुन तक्रार नोंदवली.
भाजप नेत्यांच्या दबावामुळे होत नाही कारवाई
- पती पीडित महिलेने सांगितले, की तिचा पती विजय तिला नेहमी मारहाण करतो. जी वस्तू हातात सापडेल तिने बेदम मारतो.
- महिलेला बेल्टने मारहाण करण्यात आली. त्याचे निशाण तिच्या पाठ, कंबर आणि पायावर दिसतात. मात्र यानंतरही पोलिस काहीही कारवाई करण्यास तयार नाहीत.
- विजयची भाजप नेत्यांसोबत उठबस आहे. त्यामुळे नेत्यांच्या दबावात पोलिस महिलेचे गार्हाणे ऐकून घ्यायला तयार नाही.
- महिलेच्या तक्रारीवर पतीविरोधात कारवाई करण्यऐवजी पोलिस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर काय सांगितले महिलेने..
- पीडित महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली नाही तेव्हा तिने उपमुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर कॉल करुन सांगितले, बादल साहेब तुमचे पोलिस अधिकारी महिलेची मदत करण्यास सक्षम नाहीत.
- आता माझ्याकडे आत्महत्या हा एकच मार्ग शिल्लक राहिला आहे. माझी विनंती आहे की मी मेल्यानंतर तरी अशा अधिकाऱ्यांना नक्की शिक्षा करा, कारण यांच्यामुळे महिलांना जगणे मुश्किल होत आहे.
- महिलेने पोलिसात पतीविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिस अधिकारी कुलजीतसिंग यांनी तिच्यावर आपसात वाद मिटवून घेण्यासाठी दबाव टाकला होता.
- पीडिता सोमवारी पोलिस स्टेशनमध्ये गेली होती, तिने सांगितले, पोलिस निरीक्षक कारवाई करण्याऐवजी समेट करण्यासाठी दबाव टाकत होते.
- यानंतर डिप्टी सीमच्या हेल्पलाइनवर फोन करुन महिलेने म्हटले, जर तुम्ही काही करु शकत नसाल तर आता माझ्याकडे सुसाइडशिवाय दुसरा मार्ग नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पतीचे नव्या नवरीवरील अत्याचार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...