आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 महिन्यांपू्र्वी झाले होते लव मॅरेज, मोबाइलच्या वादातून तरूणीने केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ (मध्य प्रदेश)- येथे एका विवाहितेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या एक दिवसापूर्वी तिचा नवऱ्यासोबत मोबाईलवरून वाद झाला होता. मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या पतीवर छळ करून हत्या केल्याचा आरोप केला आहे.


काय आहे प्रकरण..?
- पोलिसांनी सांगितले की, जया भगोरिया (20) या मुलीने कपिलशी लव्ह मॅरेज केले होते. बुधवारी रात्री तिचा नवऱ्यासोबत वाद झाला होता. यामुळे रागवलेली जया गुरूवारी घरातून काहीही न सांगता घरातून निघून गेली. 
- पत्नीच्या शोधात निघालेल्या कपिलला ती रेल्वे स्टेशनवर सापडली. जयाची समजूत घालून कपिल तिला घरी घेऊन येत होता. तेव्हाच जयाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोहोचलेल्या गोताखोरांनी तिला 20 मिनिटांनंतर बाहेर काढले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
- कपिलने सांगितले की, बुधवारी रात्री तो आपल्या बहिनीशी मोबाईलवरून मस्करी करत होता. तेव्हा जयाने मोबाईल जुना असल्याचा टोमना मारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. परंतु, तिची समजूत काढल्यानंतर ती शांत झाली होती. सकाळी तो कामावर निघून गेला, त्यानंतर दुपारी ही घटना घडली.
- जयाचा मोठा भाऊ दिनेशने कपिल आणि त्याच्या कुटुंबियांवर बहिनीचा छळ करून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...