आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन करून म्हणाला- पत्नीने फाशी घेतली, बेडरूममध्ये पोलिसांना आढळल्या या वस्तू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहितेच्या माहेरच्यांनी गँगरेपनंतर तिचा गळा दाबून खून झाल्याचा आरोप केला आहे. - Divya Marathi
विवाहितेच्या माहेरच्यांनी गँगरेपनंतर तिचा गळा दाबून खून झाल्याचा आरोप केला आहे.
मेरठ - येथे एका विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. मृतदेह तिच्या बेडरूमध्ये फासावर लटकलेला आढळला. मृत महिलेच्या माहेरच्यांचा आरोप आहे की, गँगरेपनंतर तिचा गळा दाबून खून झाला आहे. पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
 
बेडरूममधून आढळल्या अशा वस्तू, पोलिसांना आहे हा संशय
- ही घटना टीपीनगर परिसरातील आहे. येथे पती हेमंतसह राहणाऱ्या वर्षाचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला. मृत वर्षाच्या माहेरचे म्हणाले की, वर्षाने 4 वर्षांपूर्वी अलीगडच्या हेमंतशी कोर्ट मॅरेज केले होते. दोघांची भेट सोशल मीडियाद्वारे झाली होती.
- लग्नानंतर दोघे मुलताननगर येथे किरायाने खोली घेऊन राहत होते. हेमंत एमआयटी कॉलेजमधून बीटेक करतोय, तर वर्षा बीएचे शिक्षण घेत होती.
- रविवारी पहाटे 4 वाजता हेमंतचा फोन आला की, तो म्हणाला की, वर्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आम्ही तेथे पोहोचल्यावर मुलीचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेला आढळला.
- माहेरच्यांनी हेमंत आणि त्याच्या 3 अज्ञात साथीदारांवर गँगरेप करून गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे. सोबतच असाही आरोप आहे की, हेमंत 10 लाख नगदी आणि एक होंडा सिटी कारची मागणी करत होता, यामुळे त्याने हे कृत्य केले.
- टीपीनगर पोलिसांतील एसओ बृजेश कुमार शर्मा म्हणाले, तरुणीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. आरोपी पतीसहित 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. बेडरूममध्ये रक्ताने माखलेले एक कुशन आणि हँडग्लोव्हज आढळले आहेत. यामुळे हे हँडग्लोव्हज घालून तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर तिला फासावर लटकवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
- सध्या, आरोपींची चौकशी सुरू आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई होईल, असे पोलिस म्हणाले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित बातमीचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...