आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटले अंधाराचे जाळे; उदयपूर, गडचिरोलीतील 116 गावांत स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहोचली वीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपुर - राजस्थानातील उदयपूर शहरापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावरील आदिवासी भागातील 93 गांवांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. त्यामुळे बल्ब पेटताच याठिकाणी दररोज सायंकाळी अंधारात बुडणारी घरे प्रकाशाने उजळून निघाली. वीज नसल्याने या गावातील अनेकांचे विवाहदेखिल ठरत नव्हते. मोबाईल चार्ज करण्यासाठी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर जावे लागायचे. हर, सुवाल, महुला, आडीसेरी, नीचला थला, बिकरिया, कनकपुरा, ईंटों का खेत, बांकावास, भुजा, नाड़ी फला यासह 93 गांवांमध्ये गेल्या महिनाभरात दिनदयाल ग्राम ज्योती योजना अंतर्गत वीज पोहोचवण्यात यश आले आहेत. गेल्या काही दिवसांत गावात 1400 हून अधिक कनेक्शन झाले असून, आणखी वेगाने कनेक्शनकरण्याचे काम सुरू आहे. 
(पुढील स्लाइड्सवर वाचा गडचिरोलीतील 23 गावेही उजळली)
 
200 किमीची लाइन, 5 हजार पोल 
उदयपूरमध्ये एका वर्षापूर्वीपर्यंत 4500 हजार कुटुंबे वीजेच्या सुविधेपासून वंचित होते. पण आता केवळ एकच गाव वीजेपासून वंचित राहिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गावांत वीज पोहोचवण्यासाठी 200 किमी लांबीची वीजेची लाईन पसरवली आहे. तर त्यासाठी 25 ते 27 फुटांचे 5 हजार विद्युत खांब लावण्यात आले आहेत. 

सोयरीक जमत नव्हती
सुवालचे सरपंच वैलाराम गरासिया सांगतात की, याठिकाणी केवळ वीज नसल्याने अनेकदा सोयरीक मोडत होती. पण या समस्यांपासून आता सुटका मिळणार आहे. लोकांना झेरॉक्स काढणे, दळण दळणे अशा छोट्या छोट्या कामांसाठीही लांबपर्यंत जावे लागत होते. 

टिव्ही म्हणजे काय माहिती नाही 
सुवाल गावातील लक्ष्मीच्या घरी 5 दिवसांपूर्वीच वीज पोहोचली आहे. जेव्हा भास्कर त्यांनी टिव्हीबाबत विचारले तेव्हा तिला काहीही समजले नाही. गावात असे अनेक लोक आहेत, ज्यांना टिव्ही म्हणझे काय हेही माहिती नाही. उकाड्यावर मात करण्यासाठी आजही त्यांच्याकडे हवा हा एकच पर्याय आहे. पण आता हळू हळू पंख्यांची हवा सुरू होऊ लागली आहे. 

दिव्याच्या नव्हे लाईटच्या उजेडात अभ्यास : इंद्रा
महुला गांवातील सहाव्या वर्गात शिकणारी गिरिजा आणि ८ वीतील इंद्रा यांना लाईटबाबत विचारले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता स्पष्टपणे दिसत होती. इंद्राने सांगितले की, तिच्या घरी एका महिन्यापूर्वी वीज कनेक्शन आले. आधी अंधार पडताच गावातील मुले दिव्याच्या उजेडात अभ्यास करायचे. पण आता बल्बच्या प्रकाशात अभ्यास करतात. 

राजस्थानची 332 गावे अजूनही वीजेपासून दूर 
सरकारी गणनेनुसार 31 जुलै 2016 पर्यंत 20 राज्ये आणि 6 केंद्र शासित प्रदेशांत अजूनही पूर्णपणे वीज पोहचू शकलेली नाही. देशातील 98.54 टक्के गावांत वीज पोहोचली आहे. राजस्थानातील 332 गावे अजूनही वीजेपासून दूर आहेत. 
 
पुढे वाचा, गडचिरोलीतील अतिदुर्गम 23 गावांत पोहोचली वीज..
 
बातम्या आणखी आहेत...