आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरागस प्रश्न : मी 13 वर्षांची, आई कशी बनू? अत्याचार पीडित सात महिन्यांची गर्भवती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- बाराबंकीतील १३ वर्षीय बलात्कारपीडित बालिका लखनऊच्या क्वीन्स मेरी वैद्यकीय महाविद्यालयात १० सप्टेंबरपासून यातना भोगतेय. कारण ७ महिन्यांची गर्भवती असलेल्या या पीडितेला स्वत:च्या वडिलांनासुद्धा भेटण्यास मनाई आहे.
मी काही कारणाने रुग्णालयात प्रवेश करत आयसीयूत पोहोचले. त्या ठिकाणी ६-७ पलंग टाकलेले होते. जवळच एका स्वतंत्र खोलीत १३ वर्षांची एक मुलगी पलंगावर आणि आई फरशीवर झोपलेली दिसली. मी तिचे नाव उच्चारताच ती प्रचंड घाबरली. मात्र, आपण तिच्या पतीला भेटून आल्याचे सांगताच तिने आपबिती सांगायला सुरुवात केली. म्हणाली, १७ फेब्रुवारीच्या रात्री गावातील मंदिरामागे शौचास गेले तेव्हा गावातीलच एका श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या मुलाने बलात्कार केला. कोठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने मी कोणालाच सांगितले नाही. मात्र, ८ जुलै रोजी वांत्या होऊ लागल्याने मुजफ्फरनगरहून बाराबंकीला डॉक्टरांकडे कुटुंबीयांसोबत गेले. निदानात गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. गर्भपाताच्या परवानगीसाठी वडिलांनी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत धाव घेतली. अलाहाबाद न्यायालयाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर निर्णय देऊ, असे सांगितले. मात्र, साडेसात महिन्यांची गर्भवती असल्याने गर्भपात धोक्याचा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हापासूनच ही पीडित रुग्णालयात इतक्या कमी वयात आई बनण्याची मरणयातना भोगत आहे. यातना देणारा समोर आला तर त्याचा जीवच घेण्याची ती भाषा बोलते. तिचा आईला नेहमी एकच प्रश्न असतो, ‘मी १३ वर्षांची आहे आणि आता आई कशी बनू?’ मात्र, हताश आईकडे याचे उत्तर नाही. १७ वर्षीय मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे.

वेदना मुलीला
आईची चिंता : एखाद्या महिलेचे दु:ख पाहून रडणारी मुलगी इतक्या वेदना कशी सहन करत असेल?
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणतात डॉक्टर आणि काय आहे वकिलांचा तर्क