पाटणा - सबलपूर दियारेमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजी करून परतणाऱ्या नागरिकांनी भरलेली नौका एनआयटी घाटासमोर गंगा नदीत बुडाली. नौकेत जवळपास ६० जण होते. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता घटना घडली. रात्री ८.३० पर्यंत २० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांची संख्या आणखी वाढू शकते.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, मोटारबोट १०० मीटरपर्यंत पुढे गेल्यानंतर त्यात पाणी िशरू लागले. यानंतर अल्पावधीत नाव गंगा नदीत बुडाली. यात ३० जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. पोहता येणारे सुरक्षित बाहेर पडले.