आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरतच्या व्यापाऱ्याकडून 10 हजार मुलींना 200 कोटींच्या बाँडची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- गुजरातचे व्यापारी पाटीदार समाजाच्या सुमारे १० हजार मुलींना २०० कोटी रुपयांचे बाँडची अनोखी भेट दिली आहे. ‘बादशहा सुकन्या बाँड’ या नावाचे गुजरातच्या पाटीदार समाजात २०१५-१६ मध्ये जन्मलेल्या मुलींना व कुटुंबातील दुसऱ्या मुलांना ही भेट दिली जात आहे. त्यापैकी आतापर्यंत ५ हजार ९५९ बाँडचे वाटप करण्यात आले आहे. मंगळवारी सुरतमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात व्यापारी लवजी डी. डाल्या व उर्फ बादशहाने त्याची घोषणा केली.

डाल्या म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाआे बेटी पढाआे’ मोहिम माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. बाँडचे दुसऱ्यांदा वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी ५ हजार मुलींना गेल्या वर्षी सुरत, अहमदाबाद व राजकोटमध्ये समारंभातून बाँडचे वाटप करण्यात आले होते. बुधवारी झालेल्या कार्यक्रमातही ९६९ मुलींना या बाँडचे वाटप करण्यात आले होते. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...