आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडगाममध्ये 11 तास चालली चकमक; 3 दहशतवादी ठार, मेसेज पाठवून दगडफेकीसाठी बाेलावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांनी दहशतवाद्यांना लपवण्यासाठी सुरक्षा दलावर दगडांचा  मारा केला होता. - Divya Marathi
लोकांनी दहशतवाद्यांना लपवण्यासाठी सुरक्षा दलावर दगडांचा मारा केला होता.
श्रीनगर  - काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात लष्कराने बुधवारी पहाटे तीन दहशतवाद्यांना ठार केले. त्याअगोदर रात्रभर सुमारे ११ तासांहून अधिक वेळ चकमक सुरू होती. मंगळवारी सायंकाळी बिरवाहच्या रडबग गावांत दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय सुरक्षा दलाने व पोलिसांनी तेथे घेरावबंदी केली होती.  
 
सायंकाळी साडेसात वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. चकमकीनंतर दहशतवाद्यांच्या नातेवाइकांनी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून शरणागती पत्करण्यासही सांगितले होते. परंतु दहशतवाद्यांनी ती गोष्ट मान्य केली नाही. त्यादरम्यान दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी स्थानिक घरातून बाहेर पडले आणि त्यांनी सुरक्षा दलावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांची मदत करणारे लोकांनी सोशल मीडियावर ऑडिआे मेसेज पाठवून जास्तीत जास्त जणांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. रात्रभर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. पहाट होताच सुरक्षा दलाने दहशतवादी दडून बसलेल्या घरावर हल्लाबोल केला. त्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तिघांचे मृतदेहदेखील मिळाले आहेत.  
 
हिजबुलचे होते अतिरेकी  
चकमकीत ठार झालेले तिन्ही अतिरेकी हिजबुलचे होते. दाऊद, जावेद शेख व अकीब गुल अशी त्यांची आेळख सांगण्यात आली. जावेद बिरवाहचा राहणारा होता. साजिद श्रीनगरचा होता. तिघेही हिजबुल मुजाहिदीनमध्ये सक्रिय होते. त्यांच्याकडील एके ५६ रायफल, एसएलआर पिस्तूल आणि इतर स्फोटके जप्त करण्यात आली.  
 
श्रीनगरच्या काही भागात प्रतिबंधात्मक कलम
स्थानिक दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर श्रीनगरमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराजगंज, सफाकदल, रैनावाडी, नौहट्टा व खानयारमध्ये अशा प्रकारचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बुधवारी काही भागांत दगडफेकीच्या घटना घडल्या.  
बातम्या आणखी आहेत...