आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्राबाबूंच्या मुलाची संपत्ती 330 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तेलुगू देशम पक्षाचे सरचिटणीस आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपली संपत्ती जाहीर केली आहे. आपल्या चल-अचल संपत्तीचे मूल्य ३३० कोटी रुपये असून, या संपत्तीत २६५ कोटी रुपयांचे समभाग हेरिटेज फूड्स लिमिटेड या कौटुंबिक कंपनीचे आहेत, असे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सांगितले.

लोकेश दरवर्षी आपली आणि आपल्या कुटुंबाची संपत्ती जाहीर करतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी १४.५० कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली होती. त्यांच्यावर ६.३५ कोटी रुपयांचे कर्ज होते. लोकेश यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, माझ्या संपत्तीत कुठलीही वाढ झालेली नाही. ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या कंपनीच्या समभागांची दर्शनी किंमत सांगितली होती. याउलट उमेदवारी अर्जात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समभागांची मार्केट व्हॅल्यू दर्शवली आहे.

लोकेश म्हणाले की, माझ्या कुटुंबाची कंपनी मुंबई शेअर बाजारात लिस्टेड कंपनी आहे आणि तिच्या समभागांचे सध्याचे मूल्य एक हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. लोकेश यांच्या पत्नीकडे ५.४ कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांचा मुलगा देवांश याच्याकडे ९.०६ कोटी रुपयांचे घर, २.४ कोटी रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट आणि २.३१ लाख रुपये रोख आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...