आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये 12 वीत 12 लाख विद्यार्थ्यांपैकी 8 लाख नापास, कॉपी रोखली म्हणून...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
पाटणा - बिहार उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीचा निकाल जाहीर केला. त्यात ६५% विद्यार्थी नापास झाले. १२ लाख  ४० हजार मुलांनी परीक्षा दिली होती. त्यातील जवळपास ८ लाख मुले नापास झाली. २० वर्षांनंतर एवढा वाईट निकाल लागला. १९९७ मध्ये कोर्टाच्या देखरेखीखाली झालेल्या परीक्षेचा  १४% निकाल होता.

खुशबू कुमारीने विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक (८६.२%) पटकावला. गणेश कुमार  ८२.६% गुणांसह अव्वल ठरला. कॉमर्सच्या प्रियांशूने ८१.६% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
 
कॉपी रोखली म्हणून...
गेल्या वर्षी बिहारमध्ये टॉपर्स घोटाळा उघड झाला. यानंतर राज्य सरकारने  कॉपी  रोखण्यासाठी उत्तरपत्रिकेची कोडिंग व केंद्रांत चित्रीकरण असे उपाय केले. उत्तरपत्रिका दोन वेळेस तपासण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...