आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षीय केशर प्रख्यात वक्ता; आतापर्यंत 65 पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहसाणा- नऊ वर्षीय केशर प्रजापती चौथीची विद्यार्थिनी आहे, पण गुजरातमध्ये तिची ओळख प्रख्यात वक्ता मअशी आहे. ती स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ हा संदेश देऊन लोकांना जागरूक करते. सहा महिन्यांत तिने ५१ व्यासपीठांवरून लोकांना संबोधित केले आहे. एवढ्या कमी वयात केशरला आतापर्यंत ६५ वेळा पुरस्कृत करण्यात आले आहे.
 
अलीकडेच गांधीनगरमध्ये २५ हजार लोकांच्या उपस्थितीत केशरने मुलींना सबल करा, असे आवाहन लोकांना केले. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रूपाणी एवढे प्रभावित झाले की त्यांनी तत्काळ तिला सन्मानित केले. केशर या कामगिरीचे श्रेय वडील अल्पेशभाईंनाही देते. ती म्हणाली, “पहिल्या भाषणापासूनच बाबा नेहमी माझ्या पाठीशी होते. त्यामुळे व्यासपीठावर विचार मांडताना मला कधीही भीती वाटत नाही.”
बातम्या आणखी आहेत...