आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना गृहपाठ; ज्येष्ठांना साक्षरतेचे धडे, नक्षलग्रस्त भागात वसले झारखंडचे धुसरा गाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर - झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या गावांपैकी एक धुसरा गाव. जिल्ह्यात कमी साक्षरता असलेल्या गावांपैकी हे एक गाव. शिक्षण विभागाने आता धुसरा गाव संपूर्ण साक्षर करण्याची मोहीम हाती घेतली असून त्यात मुले हिरीरिने भाग घेत आहेत. शाळेत त्यांना आपले आई-वडील, आजी-आजोबांशिवाय अन्य ज्येष्ठांना शिकवण्याचा गृहपाठ दिला जात आहे.

मुले त्यांना अक्षरओळख होण्यापासून आकडेमोड व स्वाक्षरी करण्यास शिकवत आहेत. ज्येष्ठांना मुलांच्याच वहीत ५० ते १०० वेळा लिहून गृहपाठ करावा लागतो. दुसऱ्या दिवशी तो तपासलाही जातो. आपल्यामुळे मुलांना शिक्षकांनी रागवू नये यासाठी निरक्षर नागरिक वर्ग चुकवत नाहीत. या माेहिमेबाबत गटविकास अधिकारी सच्चिदानंद महतो म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी येथील साक्षरता ४१ टक्के होती. त्यात वाढ होऊन ९० टक्के झाली आहे. जिल्हा जनसंपर्क अधिकारी संजयकुमार म्हणाले, झारखंडच्या स्थापना दिनापर्यंत(१५ नोव्हेंबर) गाव संपूर्ण साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. १२०० लोकसंख्येच्या गावात मोहीम यशस्वी ठरल्यास सरकार हे मॉडेल राज्यभर लागू करेल.

सरपंच गंगाधर सिंह म्हणाले, माध्यमिक शाळेतील दोन शिक्षिका घरोघरी जाऊन साक्षरतेसाठी प्रोत्साहन देत आहेत.
बातम्या आणखी आहेत...