आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती कोमामध्ये गेल्यानंतर घरोघरी विकल्या भेटवस्तू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद- २००४ मध्ये पती कोमात गेला. चंद्रलता जैन या महिलेने घरोघरी जाऊन हाताने बनवलेल्या भेटवस्तू विकल्या. घरात आर्टिफिशियल दागिने करत होत्या. घरातील कामे आटोपून हे दागिने आणि इतर भेटवस्तू विक्रीसाठी त्या घराबाहेर पडत. कुटुंबाची गरज भागवताना पतीच्या उपचारांतही कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. पती बरे झाल्यानंतर त्यांनीही यात मदत केली. 

चंद्रलता यांची परिस्थिती सुधारली आणि दुसरीकडे शहरात कल्पक आणि हुशार अशा कारागीर म्हणून ख्यातकीर्त झाल्या.  ३१ व्या सूरजकुंड मेळ्यात त्यांचा स्टॉल पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरला. त्यांच्याकडील अमेरिकन डायमंडचे आर्टिफिशियल दागिने  महिला पर्यटकांना खूप पसंत पडत आहेत. उद्योगनगरी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या जमशेदपूर शहराच्या त्या रहिवासी असून झारखंड मेळ्यात त्या आल्या आहेत.  चंद्रकला (५२) यांनी सांगितले, पतीला जडलेल्या आजाराचे निदान होत नव्हते. त्यांचे वजन घटून फक्त १८ किलो झाले होते.    

वाईट परिस्थितीत नातेवाइकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली; पण मी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे घरची मंडळी नाराज होती. परिवारात महिलांनी चेहरा  पदराने झाकून टाकण्याचा रिवाज आहे.

 एका झोळीत भेटवस्तू ठेवून त्या विकायच्या ही कल्पना नातेवाइकांना सांगितली तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली. मलाही ठाऊक होते की, वाटते तेवढे हे काम सोपे नाही. परंतु अदृश्य शक्तीची मला मदत मिळत आहे, असे वाटत होते. काही वस्तू हाताने बनवल्या, काही मार्केटमधून आणून त्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. एक ते दोन महिने मला खूप त्रास झाला; पण काही तरी वेगळे करून दाखवू शकते, हा विश्वास मनात होता. लहानपणी डिझायनिंगची काही कामे शिकले होते, ती आता कामी आली. २००४ पासून सुरू केलेले काम आजही सुरूच आहे. कोणाचीही आर्थिक परिस्थिती बिघडू शकते; पण एखादे कौशल्य हातात असेल तर कुटुंबाला पुन्हा उभारी देता येते.    

चंद्रकला बनवतात अशा प्रकारच्या वस्तू    
चंद्रकला गळ्यातील, कान व नाकातील दागिने बनवतात. त्या तांबे, लाकूड आणि मातीपासून असतात. तांब्याच्या दागिन्यांत अमेरिकन डायमंड लागलेले असतात. त्यामुळे ते आकर्षक दिसतात. लाकूड आणि मातीचे दागिने तयार होतात. त्यांच्या स्टॉलवर अमेरिकन डायमंड, पोलकी आणि कुंदन ज्वेलरी आहे. आता त्यांचे चिरंजीव धीरज जैन या व्यवसायात त्यांना मदत करतात. चंद्रलता आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करण्याची पद्धत महिलांना शिकवतात.