आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उडता पंजाब’मध्ये 13 कट, ‘आप’च्या चित्रपटात निवडणूक आयोगाचे 10 कट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - आम आदमी पक्षाने ड्रग्ज, कायदा व सुव्यवस्था, श्री गुरुग्रंथसाहिबची अवहेलना  अादी मुद्द्यांवर एक तासाचा चित्रपट बनवला आहे. निवडणूक आयोगाने यावर १२ कट सुचवले आहेत. अतिरिक्त सीईओ स्तरावर कट सुचवण्यात आल्यानंतर पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. के. सिंग यांना कट्स सुचवू नयेत, अशी विनंती केली. त्यांनी दोन कट हटवून १० कट्स कायम ठेवले. “आप’ चे वकील शनिवारी व्ही. के. सिंग यांना भेटले होते. व्ही. के. सिंग यांनी म्हटले, १० कट योग्यच आहेत. यासंदर्भात एक-दोन दिवसांत निर्णय होईल.  

धार्मिक भावना भडकण्याची शक्यता  : श्री गुरुग्रंथसाहिब यांची अवहेलना करण्यावरून तयार दृश्यातील काही भाग आक्षेपार्ह असल्याचे आयोगाने म्हटले आहे. अशा प्रकारे धार्मिक भावना भडकवून त्याचे सादरीकरण करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातही असेच म्हटले आहे. 
 
ड्रग्जसाठी मजिठियांना जबाबदार दर्शवले  
पंजाबमध्ये ड्रग्जवर तयार झालेल्या चित्रपटास सेन्साॅर बोर्डाने सुरुवातीला ९४ कट्स सुचवले होते. यास तीव्र विरोध होताच १३ कटवर  चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली. “आप’ने एक तासाचा चित्रपट तयार केला असून हा चित्रपट प्रचार सभांतून दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात ड्रग्जचा प्रमुख मुद्दा  बनवला असून  त्यासाठी महसूलमंत्री विक्रम मजिठिया यांना जबाबदार धरले आहे. चित्रपटात व्यसनामुळे मरण पावलेल्या तरुणांचे मृतदेह, त्यांच्या मातांचा आक्रोश आणि इतर गोष्टी दाखवण्यात आल्या .