आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘समान नागरी कायदा लागू होईपर्यंत हिंदूंनी चार मुले जन्माला घालावीत’- आचार्य गोविंद देव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उडपी   (कर्नाटक)- भारतात समान  नागरी कायदा लागू होईपर्यंत लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी हिंदूंनी चार मुले जन्माला घालावीत, असे प्रतिपादन हरिद्वारच्या भारतमाता मंदिराचे आचार्य गोविंद देव यांनी केले. एकट्या हिंदू समाजावर दोन मुलांची सक्ती करू नये.  ज्या ज्या भागात हिंदूंची संख्या घटली, तेथे लोकसंख्येचे असंतुलन होऊन तो भूभाग भारताने गमावला, असे ते म्हणाले.  विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कर्नाटकातील उडपी येथे आयोजित  तीनदिवसीय धर्म संसदेच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.   


आचार्य गोविंद देव म्हणाले, दोन मुलांची सक्ती केवळ हिंदूंवर करू नये. ज्या भागातील हिंदूंची संख्या घटली तेथे आपला पराभव झालेला दिसून येतो. सरकार दोन मुलांची सक्ती करत आहे. पण समान नागरी कायदा लागू होईपर्यंत भारतात हिंदूंनी किमान चार मुले जन्माला घालावीत. उडपी येथील धर्म संसदेत २ हजार हिंदू अभ्यासक, मठाचे प्रमुख आणि देशभरातील विश्व हिंदू परिषदेचे नेते उपस्थित आहेत.   दरम्यान, धर्मसंसदेवर दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्याचे म्हटले जात होते. पण पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांनी याचा इन्कार केला आहे. आयोजन स्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तेथे श्वान पथक व बॉम्ब शोध नाशक पथकही तैनात करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...