आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 कोटींच्या बुलेटप्रूफ खोलीत आनंदपाल करायचा क्रूर छळ; पत्रकारांना महत्त्वपूर्ण पुरावे सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- आनंदपाल चकमकप्रकरणी २३ व्या दिवशी रविवारी राजस्थान पोलिसांनी जयपूर येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी सहायक पोलिस महासंचालक पी. के. सिंह, उमेश मिश्रा आणि एन. आर. के. रेड्डी यांनी नवे मुद्दे आणि पुरावे सादर केले. आनंदपालचा नागौर जिल्ह्यातील लाडनू येथे आलिशान फार्म हाऊस होता. तेथे त्याने चित्रपटात दाखवतात तशा प्रकारची टॉर्चर रूमही तयार केलेली होती, अशी माहिती या वेळी  पी. के. सिंह यांनी दिली. 
 
या रूममध्ये दाट काळोख असायचा.  आठ फूट उंचीवर एक प्रकाशासाठी झडप ठेवण्यात आलेली होती. लोकांना डांबून ठेवण्यासाठी त्याने अनेक लॉकअप रुम्स तयार केलेल्या होत्या. त्यात तो लोकांना डांबून ठेवत असे. या टॉर्चर रूममध्ये तीनशेहून अधिक वटवाघळे आढळली. खंडणीची रक्कम हातात पडेपर्यंत तो येथे पळवून आणलेल्या लोकांना डांबून ठेवत असे.  या लॉकअप रूमच्या वर दोन मजले होते. तळमजल्यावरील खिडक्या बुलेटप्रूफ होत्या. छत सिमेंट काँक्रीटने बंकरप्रमाणे तयार केले होते.  

आनंदपालच्या टोळीने मृतदेहाचे तुकडे करून अॅसिडमध्ये टाकले; हाडांचा चुराडा फेकला  
पी. के. सिंह यांनी सांगितले, १९९२ मध्ये आनंदपालवर गुन्हे दाखल होत गेले. यात खून, अपहरण, दरोडा यासारखे ४० गुन्हे दाखल होते. आनंदपाल आणि त्याच्या टोळीने अशा हत्या इतक्या क्रूर पद्धतीने केल्या की, पाहणाऱ्यांचा थरकाप उडत असे. पोलिसांनी सांगितले, नानूराम नावाच्या व्यक्तीस आनंदपालच्या टोळीने पंख्याला उलटे टांगून त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. अर्धवट कापलेल्या अवस्थेत नानूरामचे तुकडे केले. त्यानंतर मृतदेह अॅसिडमध्ये टाकला. तुकडे वितळल्यानंतर त्यांचे दात व हाडांचा चुरा करून तो फेकून दिला. आनंदपाल खाणींच्या मालकांकडून खंडणी वसुली करत होता. त्याच्या टोळीने एका किरकोळ कारणांवरून एका विक्री प्रतिनिधींची हत्या केली होती.  

अनेक राज्यांच्या टोळीशी संबंध  
एडीजी सिंह यांनी सांगितले, आनंदपालने पंजाबच्या रॉकी गँगकडून शस्त्रे घेतली. तो यूपीतील धनंजयच्या संपर्कात होता. हरियाणात तो आश्रय घ्यायचा. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथेही त्याचा संपर्क होता.