आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल पाच महिन्यांनंतर कळले.. मुले बदलली!, टोळी कार्यरत असल्याचे झाले उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
सिमला - कमला नेहरू रुग्णालयात (केएनएच) पाच महिन्यांपूर्वी दोन मुुलांची अदलाबदल झाली. डीएनए रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले. यासंदर्भातील चौकशी अहवाल सिमल्यातील पोलिस अधीक्षकांनी उच्च न्यायालयात सादर केला. न्यायवैद्यक प्रयोगशाळा जुंगाच्या डीएनए विभागातील सहायक संचालकांच्या अहवालानुसार शीतल व अनिलकुमार यांचा डीएनए निशांत या मुलाशी जुळतो. मात्र, हॉस्पिटलमधून त्यांना मुलगी देण्यात आली होती.
अमानत या मुलीचा डीएनए अंजना आणि जितेंद्रशी जुळतो आहे. त्यांना मुलगा देण्यात आला हाेता. चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले, आम्ही त्या दिवशी लेबर रूममध्ये असलेल्या डॉक्टरांची नावे अाणि पत्ते मागवले आहेत.
२६ मेची घटना
२६ मे रोजी केएनएचमध्ये शीतलला मुलगा झाला. नर्सने तिला ही वार्ता सांगितली. नंतर तिच्याकडे मुलगी सोपवण्यात आली. त्यावरून या दांपत्यास संशय आला. त्यांनी चौकशी केली असता केएनएचमध्ये मुलांची अदलाबदल करणारी टाेळी आहे. त्यांनी स्वत:हून मुलीची डीएनए चाचणी केली. ती काही जुळली नाही. तेव्हा त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
मुलीचा विरह असह्य
शीतल : मला माझा मुलगा मिळाला; पण माझी मुलगी ‘अमानत’ माझ्यापासून दूर गेली आहे. त्याचे निश्चितच वाईट वाटते.

आम्हाला मुलगीच हवी
अंजना : मुलगा निशांतचा सांभाळ करणाऱ्या अंजनाची अवस्था खूप वाईट झाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर तिने कारवाईची मागणी केली आहे. शीतलनेही त्याच दिवशी गोंधळ घातला असता तर ही वेळ आली नसती.
बातम्या आणखी आहेत...