आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : मोदींनी लालूंना म्‍हटले भूजंग प्रसाद तर नीतीशकुमारांना चंदन कुमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विचार व्‍यक्‍त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. - Divya Marathi
विचार व्‍यक्‍त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गया (बिहार) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) बिहारच्‍या गया येथे बीजेपीच्‍या परिवर्तन रॅलीला संबोधित केले. दरम्‍यान, त्‍यांनी लालूप्रसाद यादव आणि मुख्‍यमंत्री नीतीशकुमार यांच्‍यावर कडाडून टीका केला. त्‍यासाठी त्‍यांनी आपल्‍या भाषणात अनेकदा 'जंगलराज' हा शब्‍द वापरला.

रॅलीमध्‍ये त्‍यांनी म्‍हटले, '' कोण भूजंग प्रसाद आहे आणि कोण चंदन कुमार आहे, हेच आम्‍हाला कळाले नाही,'' असे ते म्‍हणाले. नीतीश कुमार यांनी काही दिवसांअगोदर म्‍हटले होते चंदनावर भूंजग जरी राहत असला तरी चंदन विषारी होत नाही, हा मुद्दा पकडून मोदी यांनी त्‍यांच्‍यावर टीका केली.
25 वर्षांपासूनच्‍या जाचाला आता मुक्‍ती मिळेल
पंतप्रधान म्‍हणाले, ''बिहारमध्‍ये लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतून अहंकारी राजवट दूर होईल आणि बिहारच्‍या नागरिकांना मुक्‍ती मिळेल. येथील लोक 25 वर्षांपासून अन्‍याय सहन करत आहेत,'' असे म्‍हणत त्‍यांनी थेट नीतीश आणि लालूवरही कडाडून टीका केली.
अन्‍य नेत्‍याने नीतीशकुमार यांना म्‍हटले लुच्‍चा
या ठिकाणी मोदी यांच्‍या भाषणापूर्वी त्‍यांच्‍या मंचावरून बीजेपी नेता शकुनी चौधरी यांनी बिहारचे मुख्‍यमंत्री म नीतीश कुमार यांच्‍यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. ते म्‍हणाले, ''देशात सर्वात जास्‍त अहंकारी आणि लुच्‍चा मुख्‍यमंत्री कोण असेल तर ते म्‍हणजे नीतीशकुमार आहेत. याचा अनुभव तुम्‍ही घेतला आहे. तसेच राबडी देवीनींसुद्धा नीतीश यांना चरित्रहीन म्‍हटले होते. नीतीश यांनी बिहारचा अपमान केला आहे,'' अशा शब्‍दांत त्‍यांनी नीतीशकुमार यांचा समाचार घेतला.
निवडणूक काळात दुसरी रॅली
बिहारमध्‍ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. दरम्‍यान, पंतप्रधान मोदी यांची ही दुसरी रॅली आहे. यापूर्वी मुजफ्फरपूरमध्‍ये त्‍यांनी भाजपच्‍या प्रचारात भाग घेतला होता. या नंतर ते 18 ऑगस्‍टला सहरसा आणि 30 ऑगस्‍टला भागलपूर सभेला संबोधित करणार आहेत. या रॅलीमध्‍ये अमित शहा, रामविलास पासवान, जीतन राम मांझी, उपेंद्र कुशवाहा आदी वरिष्‍ठ नेते सहभागी आहेत. बीजेपीला स्‍पष्‍ट बहुमत मिळावे, यासाठी पंतप्रधान काही योजनांची घोषणाही या प्रचारसभेत करू शकतात.
UPDATES:

- मोदी यांनी म्‍हटले, जागा कमी पडत आहे. विमानतळापर्यंत गर्दी दाटली आहे. मी लोकसभा निवडणुकीत याच मैदानावर आलो होते. पण, त्‍यावेळी यापेक्षा कितीतरी कमी गर्दी होती. आत ती दुप्‍पट आहे. त्‍यामुळे बिहारमध्‍ये सत्‍ता परिवर्तन होण्‍याचे वातावरण मला स्‍पष्‍ट दिसत आहे.
- मोदी मोदींचे भाषण सुरू भारत माता की जयचे नारे दिलेत.
- मंचावर येताच पीएम नरेंद्र मोदी यांनी हात हलवून अभिवादन केले.
- अमित शाह यांनी म्‍हटले, प्रचारासाठी नीतीश यांच्‍या पार्टीने 300 कोटी रुपयो खर्च केलेले दिसत आहेत. हा पैसा बिहारच्‍या जनतेचा आहे.
- बीजेपी प्रेसिडेंट अमित शाह रॅलीला संबोधित करत आहेत. म्‍हणाले, आम्‍हाला बिहारचा विकास करायला आहे.
- पासवान यांच्‍या भाषणादरम्‍यान गर्दी अनियंत्रित झाली. पोलिसांनी सौम्‍य लाठीचार्ज केला. पासवान यांनी त्‍यांना थांबवले.
- रामविलास पासवान यांनी लालू-नीतीश यांच्‍यावर केली टीका. म्‍हटले, कृष्णच्‍या रूपात मोदी तर नीतीश-लालू आहेत कालिया नाग.
- रॅलीसाठी पीएम नरेंद्र मोदी पोहोचले
कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था
या रॅलीचा दिवस काळ दिवस पाळण्‍याचे आवाहन नक्षलवादी संघटनांनी केले आहे. दरम्‍यान, गया गावाच्‍या परिसरात बाजारपेठ बंद ठेवाव्‍यात, असेही त्‍यांनी सांगितले आहे. त्‍यामुळे रॅलीदरम्‍यान सुरक्षा वाढवण्‍यात आली आहे. पंतप्रधानासाठी 5000 सुरक्षाकर्मी तैनात करण्‍यात आले आहेत. यात 3 हजार सीआरपीएफ, एसपीजी आणि एनएसजीचे जवान आहेत. शिवाय शहरात मोटार वाहन आणण्‍यास बंदी आणली आहे. तसेच ऑटो सेवाही बंद केली आहे. ही बंदी केवळ पंतप्रधानाच्‍या रॅलीपुरती राहणार
संबंधित फोटोज पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्किल करा...