आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार विधानसभा निवडणूक: जितनराम मांझींच्या ‘हम’चे निवडणूक चिन्ह टेलिफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) ला काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली होती. आता पक्षाची निशाणी टेलिफोन निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यावर शिक्कामोर्तब केले. मांझींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली. हमने एनडीएमध्ये सहभागी झाल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. २५ जुलै रोजी मुझफ्फरपूर येथील रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मांझी सहभागी झाले होते.
९ ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदींची रॅली आयोजित करण्यात आली आहे. अनेक जदयू आमदार पक्षत्याग करून हममध्ये सहभागी होणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी सांगितले. जदयूच्या आमदारांच्या आैपचारिक पक्ष प्रवेशाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे रिझवान म्हणाले. माध्यमांनी मांझी आगामी निवडणुकीत उतरणार नसल्याच्या खोट्या बातम्या दिल्या होत्या. रिझवान यांनी माध्यमांवर रोष व्यक्त केला. जितनराम मांझी बिहार निवडणुकीत व निवडणूक प्रचार अभियानात सक्रिय सहभाग घेतील. ते हम व एनडीएच्या उमेदवारांसाठी सभा घेणार असल्याचे पार्टीच्या सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...