आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा निवडणुकीपासून होईल भाजपची घसरण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फालेरिओ यांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपासून देशात भाजपची घसरण आणि काँग्रेसचे पुनरागमन सुरू होईल, असा दावा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन्हो फालेरिओ यांनी सोमवारी केला.  

पत्रकार परिषदेत फालेरिओ म्हणाले की, राज्यातील नागरिकांच्या आशा-अाकांक्षांची काँग्रेस पक्षाला पूर्ण जाण आहे. आम्ही त्यांचा सन्मान करतो. या निवडणुकीत काँग्रेसला किमान २५ जागा मिळतील आणि भाजपची ५ जागांवर घसरण होईल. भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. भाजपने गोव्याला १० वर्षे मागे नेले आहे, असा आरोप मगोप या भाजपच्याच एकेकाळच्या मित्रपक्षाने केला आहे.  शिक्षणाच्या माध्यमाच्या प्रश्नावरून राज्य सरकारने गोंधळ निर्माण केला आहे. राजकीय फायद्यासाठी समाजात दुही निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही फालेरिओ यांनी केली.  
बातम्या आणखी आहेत...