आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरामध्ये भाजप सरकार स्थापन करेल : अमित शहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरतळा - त्रिपुरामधील डाव्या पक्षाच्या सरकारने गेली पंचवीस वर्षे सत्तेवर राहून अस्थैर्य निर्माण करून टाकले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप त्रिपुरामध्ये सत्तेवर येईल, असा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.  

त्रिपुरातील जनतेला भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था ढासळलेल्या परिस्थितीत राहावे लागत आहे. त्यामुळे परिस्थिती कोलमडून पडली आहे. महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत, असा आरोप शहा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून केला. त्रिपुरातील निवडणुकीसाठी डाव्यांव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्याची शक्यता शहा यांनी नाकारली नाही. राज्याची लोकसंख्या ३७ लाखांवर आहे. त्यापैकी ६५ टक्के  लोक दारिद्र्यरेषेखाली जगतात. २५ टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणीदेखील उपलब्ध होत नाही, असा दावा शहा यांनी केला. 
 
शहा दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. चिट फंडची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी नैतिक पातळीवर करायला हवी. कारण या प्रकरणात काही बोगस संस्थांनी गरिबांचा पैसा लुटला आहे, असे शहा यांनी एका प्रश्नावर सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...