आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य भोवले; खा. रूपा गांगुलींवर गुन्हा, भाजप खासदार आणि तृणमूल मंत्र्यांत जुंपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२४ परगणा - पश्चिम बंगालमध्ये महिलांवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांवरून वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या भाजप खासदार रूपा गांगुली यांच्यावर तृणमूल काँग्रेसने टीकेची झाेड उठवली आहे. दरम्यान, एका महिलेच्या तक्रारीवरून रूपा गांगुली यांच्यावर नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. विरोधी पक्षांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.   
 
तृणमूल मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य  : भाजप नेत्या आणि खासदार रूपा गांगुली यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तृणमूलच्या मंत्र्यांनीही आणखी वादग्रस्त वक्तव्य करून सर्वांनाच धक्का दिला आहे. बंगालमध्ये बशिराहट येथे सुरू असलेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना रूपा गांगुली यांनी ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षावर टीका केली  होती. यावर प्रतिक्रिया देताना टीएमसीचे नेते आणि मंत्री शिवनदेव चटर्जी यांनी   येथील वास्तव्यात तुमच्यावर किती वेळा अतिप्रसंग घडले? असे संतापजनक वक्तव्य केले. गांगुली आपल्या जन्मभूमीबद्दलच असे उद््गार कसे काढू शकतात? गांगुलींचा हा पब्लिसिटीसाठी स्टंट असल्याची खिल्ली त्यांनी उडवली. दार्जिलिंगमध्ये सुरू असलेले गुरखा आंदोलन आणि २४ परगणा जिल्ह्यातील बशीरहाट येथे झालेली जातीय दंगल यामुळे राज्यात अशांतता पसरली आहे. तृणमूल काँग्रेसने या अराजकाबद्दल भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावरून वाद आणखी चिघळला आहे.
 
भाजपने केला बचाव  : रूपा गांगुली यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते त्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. भाजपचे नेते राहुल सिन्हा म्हणाले, लोकांनी त्यांचा शब्दश: अर्थ काढू नये. 
 
वक्तव्यावर ठाम  
वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या रूपा गांगुली यांच्यावर चौफेर टीका हाेत आहे. पण त्या अद्यापही वक्तव्यावर ठाम आहेत. शनिवारी या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, तसे पाहू जाता १५ दिवसही खूप होतात. त्याहीपेक्षा कमी दिवसांत बंगालमध्ये जाणाऱ्या महिलांवर बलात्कार होतील.  
 
प्रकरण काय होेते?   
खा. रूपा गांगुली यांनी म्हटले होते की, ममता बॅनर्जी यांच्या समर्थक पक्षांनी त्यांच्या लेकी-सुनांना ममतांना समर्थन देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्यावे.  त्यांच्यावर तेथे बलात्कार होतील.