ब्ल्यू व्हेल देतोय आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी; नववीतील विद्यार्थाचा खुलासा
4 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
झुंझंनू- सुसाइड गेम ब्ल्यू व्हेलचे लोण झुंझनू जिल्ह्यातही पसरले आहे. जिल्ह्यातील बिसाऊ येथील राजकीय जटिया शाळेत गुरुवारी शिक्षकांनी मुलांना या गेमचे दुष्परिणाम सांगितले. हा गेम खेळू नका, असे आवाहन त्यांनी केले. तेव्हा नवव्या इयत्तेतील एका मुलाने सांगितले, या गेमच्या तीन स्टेज मी गाठल्या आहेत. आता माघार घेऊ इच्छितो. परंतु आईवडिलांना ठार करण्याची धमकी मिळत आहे. मला त्यापासून वाचवा. यामुळे शाळेत खळबळ उडाली.