आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागास-ब्राह्मण नेते भाजपत, तर मुस्लिम सपा-बसपामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराचे वारे वाहू लागतात. दलबदलू पुढाऱ्यांना राजकीय हवामान तज्ज्ञ असेही म्हटले जाते. या वेळी पक्षांतरामुळे राजकीय पक्षांची गणिते बदलत चालली आहेत. सोमवारी रालोद विधिमंडळ पक्षाचे नेते दलवीरसिंग चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बसपा आणि काँग्रेसच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केले आहे. पक्षांतर करणाऱ्या आमदारांनी व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा प्रकारे भाजपमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये १६० आमदार व  प्रमुख नेते, माजी खासदार आणि माजी आमदारांचा समावेश आहे. यात ७५ पेक्षा  नेते बसपातून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यात ब्राह्मण, मागास आणि दलित जातींचा समावेश आहे. पक्षांतरामुळे काँग्रेस आमदारांची संख्या २८ वरून २० झाली आहे. बसपा विधिमंडळाचे नेते स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासह १४ अामदारांचा समावेश आहे. 
 
बसपाचे मौर्य यांच्या भाजप प्रवेशाने समीकरण बदलले
मागासवर्गीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये  प्रवेश केल्याने या घटनेला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. मौर्य आणि कुशवाहसह अनेक मागासवर्गीय नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागास जातीमध्ये मौर्य, कुशवाह, कुंभार,  प्रजापती, लोहार, सैनी, कश्यप, विश्वकर्मा यांची लोकसंख्या सुमारे २० टक्के इतकी आहे.  बसपावर नाराज असलेले नेते स्वामीप्रसाद मौर्य भाजपमध्ये दाखल झाले. पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारणपूरमधून माजी मंत्री धर्मसिंग सैनी यांनी बसपाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तर ललितपूरचे बसपा आ. रमेश कुशवाह यांनी प्रवेश केला. अनेक जाट नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत.
 
भाजपच्या समर्थनार्थ डाॅ. रिता जोशी यांनी ब्राह्मणवर्गात जागवला नवा उत्साह
भाजपात अनेक मागासवर्गीय नेते दाखल होत असून त्याखालोखाल ब्राह्मणवर्गाचा दुसरा क्रमांक लागतो.  माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांची मुलगी रिता बहुगुणा व माजी मुख्यमंत्री श्रीपती मिश्रा यांचे चिरंजीव भाजपमध्ये दाखल झाले. 

मायाच्या मतपेढीवर भाजपचा डल्ला : भाजप दलित वर्गातही फूट पाडण्यात यशस्वी ठरली आहे. यापैकी धोबी, पासी, कोरी, वाल्मीकी, खाटीक नेते भाजपमध्ये दाखल झाले. 
बसपा : मुस्लिम-दलितांची सोशल इंजिनिअरिंग, मुस्लिम नेते आणि आमदारांना पक्षात स्थान
बसपाने या वेळी दलित-मुस्लिम मतांसाठी रणनीती आखली असून मुस्लिम नेते आणि अामदारांना पक्षात स्थान दिले आहे. राज्यात १९ टक्के मुस्लिम आहेत, तर २२ टक्के दलित. पक्षाने विधानसभानिहाय जातींची संख्या पाहूनच तिकीट दिले आहे. 

राज्यात यादव-मुस्लिम समीकरण मजबूत करण्यासाठी कुर्मी समाजाची सपाला हवी साथ
उप्रमध्ये पाच वर्षे बहुमतात सरकार चालवणाऱ्या  समाजवादी पक्षात दाखल हाेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. कौमी एकता दलाचे सपामध्ये विलीनीकरण आणि बेनीप्रसाद वर्मा यांचा  पुन्हा पक्षात प्रवेश  सपासाठी महत्त्वाचे ठरले. पक्षाकडून बसपामधून निलंबित केलेले मध्य उप्र. चे अब्दुल मन्नान आणि त्यांचे बंधू हन्नान, अन्वर हसन आणि कमर हसन यांना पक्षात घेतले आहे.