आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवमान प्रकरणात सुप्रीम कोर्टात हजर होणार नाही : कर्णन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेएस खेहर, जस्टिस कर्नन - Divya Marathi
जेएस खेहर, जस्टिस कर्नन
कोलकाता - अवमान प्रकरणात ३१ मार्च रोजी सर्वाेच्च न्यायालयात हजर राहणार नसल्याचे कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.एस. कर्णन यांनी सांगितले. सर्वाेच्च न्यायालय मुद्दाम त्रास देण्यासाठी  अवमाननेची कारवाई करत असल्याचे ते म्हणाले.
 
पत्रकारांशी बोलताना कर्णन म्हणाले, ३१ मार्च रोजी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणाऱ्या 
अवमानना खटल्याच्या  सुनावणीस जाणार की नाही? या प्रश्नावर कर्णन यांनी मी का म्हणून जावे, असा उलट प्रश्न त्यांनी केला.
 
२० न्यायमूर्तींवर केले भ्रष्टाचाराचे आरोप :
 न्या. कर्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रात २० न्यायमूर्तींविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात एक माजी सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाच्या एका विद्यमान व दोन निवृत्त न्यायमूर्तींचाही समावेश आहे. हा न्यायालयाचा अवमान समजून सर्वोच्च न्यायालयाने त्याची स्वत:होऊन दखल घेतली. त्याची सात न्यायमूर्तींचे घटनापीठ सुनावणी करत आहे.

न्या. कर्णन पूर्वीपासूनच वादग्रस्त :
- सन २०११ मध्ये मद्रास उच्च न्यायालयात सहकारी न्यायमूर्तींविरुद्ध जातिसूचक शब्द वापरल्याची तक्रार दाखल केली होती.
-२०१४ मध्ये मद्रास उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांबाबत मुख्य न्यायमूर्तींच्या कक्षात घुसले आणि गैरवर्तन केले होते.
-२०१६- मध्ये कॉलेजियमने न्या. कर्णन यांची बदली मद्रासहून कोलकाता उच्च न्यायालयात केली. त्याला न्या. कर्णन यांनी स्वत:च स्थगिती दिली. मात्र नंतर माफीही मागितली होती.
 -कोलकाता उच्च न्यायालयात काम सुरू केल्यानंतर मद्रासमधील सरकारी निवासस्थानही सोडले नाही. मद्रास उच्च न्यायालयाशी संबंधित न्यायिक व प्रशासकीय फाइली परत केल्या नाहीत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, सरन्यायाधीश - जामिनपात्र वॉरंट शिवाय आता पर्यायच उरला नाही...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...