आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करुग्णाला आशावादी ठेवण्यासाठी खास पुस्तक- लेखिका नीलमकुमार यांना दिले वचन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 बंगळुरू  - ठरतील अशा कथांचे खास पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. यातील पात्र विनोदी असल्याने  ते उपचारादरम्यान आशावादी ठेवतील, असा दावा लेखिका नीलम कुमार यांनी केला आहे. नीलम कुमार या कर्करुग्ण असून त्यांचा हा पुढाकार स्वागतार्ह असल्याचे उद्योगपती रतन टाटा आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. हे दोघे पुस्तक निर्मितीसाठी निधी देणार आहेत. पुस्तकातील पात्रे कर्करोगाशी लढा देणारी असतील. 
 
हे पुस्तक विनोदी शैलीत लिहित असल्याचे नीलम यांनी सांगितले. यापूर्वी त्यांची ७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कर्करुग्णांची देखभाल करणारे आणि रुग्ण या दोघांसाठी हे पुस्तक प्रेरणास्रोत ठरेल. आपली पूर्वी प्रकाशित झालेली पुस्तके देखील कर्करुग्णांना सकारात्मक बनवणारी होती. या यशानंतर अभिनेता अमिताभ बच्चन, रतन टाटा यांनी आगामी दोन पुस्तकांसाठी अर्थसाहाय्य देण्याचे वचन दिले आहे.  
 
आपण कर्करुग्ण असल्यानेच लेखणी हाती घेतली, असे नीलम सांगतात. माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या संघर्षामुळे पूर्णत: बदलल्याचे त्यांनी सांगितले. मी यामुळे अधिक खंबीर आणि निश्चयी झाले. हे सकारात्मक असल्याचे नीलम मानतात.  
 
सेल्फ व्ही अभियानाचे यश
सेल्फ व्ही हे अभियान  यशकथा संग्रहित करण्यासाठी राबवले जाते. कर्करोगाला परास्त केलेल्यांच्या संघर्षाची कथा इतर रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे मौलिक काम याद्वारे केले जाते. कर्करोगावरचे हे पहिले कॉमिक पुस्तक अाहे. सेल्फ व्ही अभियान पिंक होप कॅन्सर पेशंट सपोर्ट ग्रुप आणि एचसीजी (हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राइजेस लिमिटेड) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येते. देशभरात रुग्ण आपल्या संघर्षाविषयी सांगतात. त्याचे संकलन या अभियानात केले जाते.
  
रुग्ण स्वत:ची चित्रफीत तयार करतात

कर्करुग्ण स्वत:ची ६० सेकंदाची चित्रफीत तयार करतात. कर्करोगावर मात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक स्तरावर केलेल्या संघर्षाविषयी आणि मिळालेल्या यशाविषयी यात चित्रण केले जाते. सेल्फ व्ही संकेतस्थळ आणि फेसबुक पेजवर हे व्हिडिओ शेअर केले जातात.
बातम्या आणखी आहेत...