आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीवरील बनलेल्या पहिल्याच चित्रपटातील 6 दृश्यांना कात्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
कोलकाता  - नोटबंदीनंतरच्या परिस्थितीवर बनलेली पहिली फिल्म  शून्यता (बांगला) च्या दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाला हरकत आहे. सेन्सॉर बोर्डाच्या क्षेत्रीय कार्यालयाने (कोलकाता) या चित्रपटातील ६ दृश्ये हटवली आहेत. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, सेन्सॉर बोर्डाने फिल्मच्या कहाणीशी जोडलेल्या या दृश्यांवर कात्री चालवली आहे. त्यास त्यांनी कधीही शॉर्टफिल्म (लघुचित्रपट) रूपात मंजूर केले होते. शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही दृश्यावर आक्षेप घेतले नव्हते. पण या लघुचित्रपटाने चित्रपटाचे स्वरूप घेताच त्यातील ६ दृश्ये आक्षेपार्ह झाली. सेन्सॉर बोर्डाने ज्या पद्धतीने ती दृश्य हटवली त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. अनेक चित्रपटांची पोस्टर्स फाडली जाताहेत, तर कुठे सेन्सॉर बोर्डावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चित्रपटाबाबत अशी परिस्थिती पाहून याचे दिग्दर्शक शुभेंदू घोष नाराज आहेत. तथापि, तमाम कट्ससह फिल्म शून्यता २१ एप्रिल रोजी देशाच्या ८० चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.    

२६ नोव्हेंबर २०१६ म्हणजे नोटबंदीच्या घोषणेनंतर या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. दररोज शूटिंग झाले आणि युनिटने एका दिवसाचीही सुटी घेतली नाही. २५ दिवसांत संपूर्ण फिल्मचे शूटिंग केले. निर्माता शुभेंदू यांनी फिल्मला तीन वेगवेगळ्या कहाण्यांत विभागले आहे. फिल्मच्या कहाण्यांना शॉर्टफिल्मचे रूप देऊन सेन्सॉर बोर्डाची स्वीकृती तर घेतली. पहिल्या कथेचे शूटिंग १० दिवसांत पूर्ण केले. २३ डिसेंबर रोजी फिल्म सेन्सॉर बोर्डासमक्ष ठेवली गेली.  बोर्डाने यामधील कुठल्याच दृश्यावर आक्षेप घेतला नाही. दुसरी शॉर्टफिल्म ७ दिवसांत पूर्ण झाली. यासही २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सेन्सॉर बोर्डासमोर ठेवले गेले. हेदेखील कुठल्याही आक्षेपाशिवाय मंजूर झाले. तिसऱ्या कथेचे शूटिंग ८ दिवसांत पूर्ण झाले. तिन्ही कहाण्या मिळून फिल्मचे रूप यास दिले गेले. २७ मार्च २०१७ रोजी बोर्डासमोर ठेवले गेले. तेव्हा बोर्डाने ६ दृश्यांवर कात्री चालवली. कापल्या गेलेल्या ४ दृश्यांचा संबंध पहिल्या व दुसऱ्या कथेशी होता, बोर्डाने मंजूर केलेे.  
 
आक्षेपार्ह कोणतेच दृश्य नव्हते : शुभेंदू घोष  
याप्रकरणी शुभेंदू म्हणतात की, या फिल्ममध्ये एकही असे दृश्य नव्हते की ज्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घ्यावा. जर ही फिल्म पश्चिम बंगालच्या जागी कुण्या भाजपशासित प्रदेशात बनवली गेली असती तर यातील कुठलेही सीन कापले गेले नसते. कारण की ही फिल्म तिथेच बनली आहे, जिथे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. यासाठी हा गोंधळ घातला जात आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, जर या चित्रपटातील दृश्ये आक्षेपार्ह होती, तर शॉर्टफिल्म कशी पास केली? सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केलेला आहे. नोटबंदीच्या नकारात्मक बाजूला समाजात येण्यापासून रोखले.  
 
ज्युरी सदस्यांनी सर्वसंमतीने कापली दृश्ये : पाल  
फिल्ममधील दृश्ये कापणारे ज्युरीचे सदस्य अग्निमित्रा पाल म्हणतात की, ६ दृश्ये कापण्याचा हा निर्णय बोर्डाच्या सर्व ज्युरी सदस्यांनी सर्वसंमतीने घेतला होता. यासाठी पुरेसे पुरावे होते. कापलेली दृश्ये समाजाने पाहण्यालायक नव्हती. ही दृश्ये शॉर्टफिल्ममध्ये पास करण्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, याप्रकरणी अधिक काही बोलता येणार नाही. यापूर्वीही मी काही बोलून वादात आलो होतो.  
 
लहान-लहान संवादांवर मंडळाने चालवली कात्री 
 
पहिला कट- विवाह स्थगित झाल्याने आई-मुलीत वाद
कोळसा फोडताना लक्ष्मीच्या मनात आपण मुलीचे लग्न करू शकत नाही ही चिंता आहे. नंतर एक प्रस्ताव येतो तेव्हा वर पक्ष लक्ष्मीकडे शेतासाठी पंपिंग सेट मागतो. ती शेत विकून त्याची सोय करते,पण नोटाबंदीनंतर हे नाते तुटते. मुलगी म्हणते- मी लग्न करणार नाही. आई रागाने मुलीला म्हणते, मग तू काय करणार, शरीर विकणार? सेन्सॉर मंडळाने हा संवाद चित्रपटातून वगळला.
 
दुसरा कट- लेखकाचे वक्तव्य
चित्रपटाचा सूत्रधार लेखकाने शून्यता नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्याच्या प्रकाशनप्रसंगी माध्यमे त्याला,‘तुम्ही नोटाबंदीचे समर्थन करता की नाही?’असा प्रश्न विचारतो. लेखक म्हणतो... नाही, मी नोटाबंदीचे समर्थन करत नाही. त्यामुळे सामान्य लोक त्रस्त झाले, मृत्युमुखी पडले. मी त्याचे समर्थन करू शकत नाही. हा संवाद मंडळाने वगळला आहे.
 
-तिसरा कट- घोषणेवर प्रतिक्रिया
आजारी मुलाला घेऊन आई-वडील कोलकात्याला पोहोचले आहेत. पैसे जमा करायला जातात, तेव्हा नोटा रद्द झाल्याचे कळते. वडील व्यापाऱ्याकडून पैसे घेण्यास जातात. तो कोणाला फोनवर म्हणतो-नोटाबंदी करून सरकारने आश्चर्याचा धक्का दिला आहे. मगरी वाचतली, मरतील फक्त छोटे मासे... व्यापाऱ्याचा हा संवाद कापण्यात आला आहे.
 
-चौथा -लोक कसे मेले, यावरच कथा
शून्यताच्या लेखकाला एक प्रश्न विचारला जातो. प्रश्नकर्ता विचारतो, नोटाबंदीने काहीच चांगले झाले नाही का? ... काही तर सुविधा मिळाली असेल ना? लेखक प्रश्नकर्त्याकडे पाहतो आणि म्हणतो... नोटाबंदीमुळे काय सुविधा मिळाल्या, हे माध्यमांतून कळाले. माझी कहाणी सामान्य जनतेवर आहे. जनतेने नोटाबंदीच्या काळात आयुष्ट कसे कंठले, कसा प्रवास केला, कसे मेले... हेच लिहिले. हा संवाद कापला.
 
पाचवा -रुपये जमा केल्याचे दु:ख
एका कंजूस अभियंत्याला त्याचा मित्र विचारतो-सरकारने सर्वांना फसवले आहे. ५०० आणि १००० च्या नोटा बंद. हे एेकून अभियंत्याला हार्ट अटॅक आला. पत्नी आणि मुलीसमोर रडतो. मृत्यू जवळ असतानाही त्याला पैशाची चिंता आहे का? या दृश्यावरही कात्री चालली आहे.
 
सहावा  - कथा वस्तुस्थितीदर्शक
सूत्रधार लेखकाला एक मुलगी विचारते-तुमच्या कादंबरीची (शून्यता) कथा काल्पनिक आहे की खरी घटना आहे? लेखक म्हणतो-कादंबरीतील तीन कथा काल्पनिक आहेत, पण त्या कल्पनेतील असूनही सत्याच्या खूप जवळच्या आहेत. लेखकाचा हा संवादही हटवला आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...