आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढील आर्थिक वर्षात कृषी उत्पादनात वाढ, चांगल्या पावसाने दिलासा मिळण्याची आशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यंदा चांगला मान्सून होण्याची शक्यता असून आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा आपल्याला विश्वास असल्याचे मत कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केले. मात्र, यासंदर्भात त्यांनी कोणतीच स्पष्ट आकडेवारी दिलेली नाही. याबाबतची आकडेवारी सध्या देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्यातरी मान्सूनची स्थिती चांगली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केेले. यामुळे जुलै महिन्यात खरिपाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत पावसाच्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे एक जुलै रोजी देशभरातील खरीप हंगामासाठी फक्त २.१५ कोटी हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. ही आकडेवारी गेल्या वर्षी याच कालावधीतील पेरणीच्या तुलनेत २२.७ टक्के कमी आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्यात सामान्यपेक्षा १०७ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात सामान्यपेक्षा १०४ टक्के जास्त पाऊस पडणार आहे. मात्र, जास्त पावसाची शक्यता असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीतीदेखील कृषी विभागाला वाटत आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळ या दोन्ही नैसर्गिक बाबी असल्या तरी अद्याप पावसामुळे पिके खराब झाल्याची कोणतीच माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात इशारा
भारतीय हवामान विभागाच्या वतीने मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा दिला असून यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटनेदेखील मध्य प्रदेशात जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. या परिसरात तूर, उडीद, मूग, सोयाबीन, शेंगदाणा आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात.

१०६% पावसाचा अंदाज
या वर्षी सामान्यपेक्षा सहा टक्के जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यंदा चांगला पाऊस होणे देशासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. २०१४ मध्ये सामान्यपेक्षा १२ टक्के कमी, तर २०१५ मध्ये १४ टक्के कमी पाऊस झाला आहे.

अन्नधान्य उत्पादनात वाढ
कृषी मंत्रालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या तिसऱ्या अंदाजानुसार २०१५-१६ मध्ये देशातील अन्नधान्य उत्पादन २५.२२ कोटी टन उत्पादन होईल. गेल्या वर्षी याच कालावधीत २५.२ कोटी टन उत्पादन झाले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...