आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंदिगड कन्व्हेन्शन सेंटरला हवाई दलाने घेतला आक्षेप, पठाणकोट हल्ल्याचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यानंतर रिकाम्या पडलेल्या चंदिगडच्या देशांतर्गत विमानतळावर कन्व्हेन्शन सेंटर तयार करण्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात टाकण्यात आला आहे. चंदिगड प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हवाई दलाच्या प्रशासन विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, गुप्तचर यंत्रणेकडून (आयबी) पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सातत्याने अलर्ट जारी केला जात आहे. संरक्षण मंत्रालयानेही देशांतर्गत विमानतळावर कन्व्हेन्शन सेंटर बनवण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे हा प्रस्ताव तूर्तास बारगळला आहे.

येथील विमानतळावर कन्व्हेन्शन सेंटर बनवणे विमानतळ केंद्राच्या दृष्टीने सुरक्षित नाही. त्यामुळे त्याला परवानगी नाकारण्यात आली असून हवाई दलाने देशांतर्गत विमानतळाची १७ एकर जागेतील त्यांच्या वाट्याची जमीनही परत मागितली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजाेरा दिला आहे.

एअरपोर्ट अॅथाॅरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर रहेजा यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विमातळावर आता कन्व्हेन्शन सेंटर बनवले जाणार नाही. हवाई दलाने त्यांची जमीन परत मागितली आहे. येथील विमानतळ बंद पडणार का‌? असे विचारले असता ते म्हणाले की, राज्य सरकार त्यांच्या विमान उड्डाणासाठी त्याचा वापर करू शकते.

प्रगती मैदानासारखे प्रदर्शन भरणार होते
ऑक्टोबर २०१६ मध्ये येथील देशांतर्गत विमानतळ रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर बनवण्यासाठी चंदिगड प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. येथील १७ एकर जागेवर दिल्लीतील प्रगती मैदानाच्या धर्तीवर भव्य प्रदर्शन मोठ्या कॉन्फरन्स आयोजित करण्याचे नियोजन होते.
बातम्या आणखी आहेत...