आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनआर चेक करा; मिळेल रेल्वेविषयीची सर्व माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - तुम्ही रेल्वे तिकिटाचा पीएनआर चेक कराल तेव्हा संबंधित रेल्वेविषयी विविध माहिती मिळणार आहे. रेल्वे किती उशिराने धावत आहे. तुम्हाला ज्या स्थानकावरून बसायचे आहे तिथून रेल्वे किती किमी अंतरावर आहे, अादी माहिती मिळू शकेल. नवी व्यवस्था फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, रेल्वेला कॉम्प्युटर सॉफ्टवेअर उपलब्ध करणाऱ्या क्रिसला नव्या सुविधा देण्यास सांगितले अाहे. रेल्वे मंत्रालयात नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत प्रवाशांना पीएनआर तपासताच संबंधित रेल्वेबाबत अधिक माहिती उपलब्ध केली जावी, असे ठरले. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या तांत्रिक शाखेने क्रिस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला.