आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला प्रथमच गणवेशात पाहून केले सॅल्यूट, मीही आर्मी ऑफिसरच होणार- मुलाची ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- शनिवारी चेन्नईमध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होऊन सागरची निधी दुबे  लष्करात अधिकारी झाली. निधीचे पती मुकेश दुबे यांचे लग्नास एक वर्षही पुरे होत नाही तोच त्यांचे निधन झाले.  ते महार रेजिमेंटमध्ये नायक होते. सासरच्या मंडळींनी मुकेशच्या मृत्यूनंतर निधीला गर्भावस्थेत असतानाच घराबाहेर काढले. वडिलांकडे परतल्यानंतर निधी डिप्रेशनमध्ये गेली होती.   मुलाच्या जन्मानंतर तिचाही पुनर्जन्म झाला. तिला उभारी मिळाली. पाचव्या प्रयत्नानंतर ती एसएसबी उतीर्ण झाली.  पासिंग आऊट परेडमध्ये  मुलगा सुयशने तिला गणवेशात पाहून सॅल्यूट केला आणि तो म्हणाला, ‘आई, तू खूप छान दिसते आहेस. मीसुद्धा तुझ्यासारखा लष्करात अधिकारी होणार.’ त्याची ही वाक्ये ऐकताच निधी सगळे कष्ट विसरली.    

निधीच्या संघर्षाची कथा तिच्याच शब्दांत..   
जेव्हा मी १ ऑक्टोबर २०१५ रोजही ओटीएला रुजू झाले. तेव्हा मला तेथील हवामानात जुळवून घेण्यास अडचणी आल्या. मला सुरुवातीला उलट्यांचा त्रास झाला. हळूहळू तेथील वातावरणात रुळले. एकही दिवस मी प्रशिक्षणात गैरहजर राहणार नाही, असे ठरवले. प्रशिक्षणात सर्वप्रथम वर्कआऊट, ५० मीटर स्विमिंग, ५ किमी रनिंग, त्याचबरोबर ३० किमी पायी चालण्याचे प्रशिक्षणही होते. यात २४ किलो हेवी पिठ्ठू वेट आणि रायफलसह चालावे लागत होते. पहाटे ४ वाजता प्रशिक्षण सुरू व्हायचे. रात्री १० वाजता संपत हाेते. लाइट बंद झाल्यानंतर माझ्या डोक्यात प्रशिक्षणाचा अभ्यास सुरू व्हायचा. माझ्यासोबतच्या मुली २० ते २२ वर्षे वयाच्या होत्या. मला खूप अडचणी येत गेल्या.  मी आईसुद्धा होते. वय झाल्याने शारीरिक व्याधीही होत्या. मी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेताना घोड्यावरून पडले. त्यामुळे मला बराच मार लागला. पोहताना भीती वाटत होती. परंतु हार मानली नाही.  

माझी कमजोरी माझी ताकद बनली. माझ्या नजरेसमोर माझे पती मुकेश व मुलगा सुयश दोनच चेहरे कायम दिसत. मुलाला दिलेले आश्वासन मला पूर्ण करायचे होते. मी कमजोर नाही, हे त्याला दाखवून द्यायचे होते. प्रशिक्षण घेत असताना शरीरानेही साथ दिली नाही. आता यातून मी पुन्हा उभारी घेणार नाही, असे वाटू लागले. पण स्वत:ला मानसिकदृष्ट्या तयार केले. जिद्दीने मी लक्ष्यापासून दूर गेले नाही. प्रशिक्षणावर मी भर दिला. हळूहळू माझी क्षमता वाढत गेली.  एक-दोन महिन्यांनंतर मी प्रशिक्षणात रमले.  सर्वकाही ठीक चालू  होते. माझे केस कापण्यात आले. प्रशिक्षण चालू असताना केवळ दोन वेळा मुलाला भेटले होते.
बातम्या आणखी आहेत...