आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलामुळे काळवंडलेला किनारा स्वच्छ करण्यासाठी शेकडोंचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तेल टँकर व स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर यांच्यातील धडकेत मोठ्या प्रमाणात तेल सांडले. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील पाणी काळवंडून गेले. त्यातून पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण होणार असल्याची जाणीव ठेवून शेकडो विद्यार्थी किनाऱ्यावरील सफाईच्या कामात सक्रिय झाले. अर्थातच त्यांना साथ मिळाली मासेमार, अभियंत्यांची. स्वच्छतेसाठी अभियंत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शनिवारी दिवसभर युद्ध पातळीवर हे तेल अनेक पिंपात गोळा केले जात होते. ही घटना एन्नोर बंदरावर घडली. हा प्रदेश तामिळनाडूतील दक्षिण किनारपट्टवर आहे.  येथे मोठ्या संख्येने कासव आढळून येतात. विद्यार्थ्यांनी आपली संवेदना कृतीतून दर्शवली. 
बातम्या आणखी आहेत...