आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटवर्क नसल्याने मोबाइल झाडाला टांगून ब्ल्यूटूथने कुटुंबीयांशी बोलतात जवान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धमतरी (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील बहीगाव येथे नक्षल प्रभावित भागात कर्तव्य बजावणाऱ्या सीआरपीएफ जवांनाना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने बेस कॅम्पमध्ये तैनात असलेल्या जवानांना अनेक दिवसांपर्यंत पत्नी आणि मुलांशी बोलता येत नाही. मित्र आणि अधिकाऱ्यांशी संपर्कही करणेही अवघड आहे. मोबाइल नेटवर्कसाठी दरदिवशी त्यांना नवनवीन शक्कल लढवावी लागते.

जवानांनी कॅम्पच्या बाहेर झाडांवर जवळपास ३०-४० फुटांवरील फांद्यांवर दोरी बांधली आहे, जेव्हा कोणाशी बोलायचे असते तेव्हा ते मोबाइलला पायामोझ्यामध्ये टाकून दोरीने बांधतात. नंतर कॉल डायल करून दुसऱ्या बाजूने दोरीला ओढतात. मोबाइल जेव्हा वरती जातो तेव्हा बल्यूटूथ कानात घालून झाडाखाली तासन््तास उभे राहतात. मोबाइल उंच जात असल्याने नेटवर्क येत- जात राहते. अशा पद्धतीने प्रचंड मेहनत घेतल्यानंतर त्यांना पत्नी, मुलांशी बोलता येते.

बहीगावच्या जवळ मेचका, सिहावा, खल्लारी व बोराई हे नक्षल प्रभावित क्षेत्र आहेत. या भागाच्या जवळ कुठेच मोबाइल टॉवर नाही. याच भागातील बिरनासिल्ली कॅम्पमधील जवानांनी आठवडाभर कुटुंबीयांशी संवाद साधता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. २००९ मध्ये नक्षली हल्ला झाल्यानंतर येथे जवानांना तैनात करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...