आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार फक्त पंजाबचाच असेल : केजरीवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतियाळा - आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज बुधवार पतियाळा येते जाहीर केले की, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार फक्त पंजाबीच असेल. आपण येथे कुठलाही उमेदवार लादणार नाही हे सांगतानाच त्यांनी स्वत:ला या पदाच्या शर्यतीतून बाहेर ठेवले आहे, आपण दिल्ली चेच मुख्यमंत्री राहू शिवाय आपल्यावर इतरही मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, म्हटले आहे, ते पतियाळाजवळील बादशपूर येथील सभेला संबोधित करतांना बोलत होते.
 
यामुळे आपचे पंजाबचे खासदार भगवंत मान यांच्या मुख्यमंत्री बाहेरील नव्हे तर पंजाबीच असेल या विधानाला पुष्टीच मिळाली आहे. आणि मनीष शिसोदियांनी केलेल्या प्रचाराला ठेंगा मिळाला आहे. अशातच मनीष शिसोदिया यांनी पंजाबच्या लोकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून आपला मते देतांना अरविंद केजरीवाल यांना पाहावे वा त्यांनाच भावी मुख्यमंत्री मानुन आपच्या उमेदवारांना मते द्यावीत असे आवाहन केले होते. आणी त्यावर लगेचच खासदार भगवंत मान यांनी पंजाबी अस्मितेला शोभणारी वरील प्रतिक्रिया दिली होती. मात्र केजरीवालांच्या या सभेतील खुलाशानंतर आता या वाकयुध्दावर वा वादावर पडदा पडला आहे. पंजाबमध्ये पुढील महिन्यातच म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. आता प्रचारासाठी महिनाही न उरल्याने पंजाबची निवडणूक रणधुमाळी आता चरणसीमेवर आली. 
 
गहाण प्रॉपर्टीज सोडवू
केजरीवालांनी दावा केली की, आत्ता कुठे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष झोपेतून जागे झाले आहेत. रात्री त्यांनी स्वप्न पाहीले होते की, केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री झाले आहेत. चिट फंड कंपन्यांच्या घोटाळ्याविषयी ते म्हणाले की, आम्ही आप गरजू व गरीबांच्या गहाण पडलेल्या प्रॉपर्टीज व पैसे-रकमा सावकारी कंपन्यांकडून सोडवू दिल्लीत दुसऱ्यांदा सिव्हील सोसायट्यांच्या माध्यमातून सत्ता मिळविणारे आप पंजाबातही मार्ग बनवितांना दिसत आहे. मुख्यमंत्री ठरविण्याची जबाबदारी केजरीवालांचीच असेल शिसोदियांनीही सत्तेत आल्यावर केजरीवाल सर्व आश्वासने पूर्ण करतील, अशी ग्वाही दिली. केजरीवाल म्हणाले की, कांॅग्रेसचा निवडणूक जाहीरनामा पूर्णत: खोटा आहे. पंजाब कांॅग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग हे तर स्वत:च म्हणाले आहेत की, निवडणूकीपूर्वी एखादेवेळी आश्वासने द्यावी लागतात.