आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षशिस्तीचे उल्लंघन; अच्युतानंदन यांना इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपुरम - पक्षाची शिस्त कायम राखा, अशा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने रविवारी ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांना दिला.

पक्षाच्या केंद्रीय समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, केरळ प्रकरणात पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या आयोगाने दिलेला अहवाल समितीने स्वीकारला आहे. पक्षशिस्त कायम राखा, असा इशारा अच्युतानंदन यांना देण्यात आला आहे. राज्य समिती आणि केंद्रीय समितीच्या बैठकीत अच्युतानंदन यांना निमंत्रित करण्यात आले आहे, त्यांनी तेथे आपले मत मांडावे, बाहेर नव्हे, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

माकपच्या राज्य शाखेची परिषद फेब्रुवारी २०१५ मध्ये अलाप्पुझा येथे झाली होती. अच्युतानंदन यांनी या परिषदेतून सभात्याग केला होता. त्यामुळे माकपला चांगलाच धक्का बसला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश कारत यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमण्यात आला होता. त्यावेळी पक्षाचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी मतभेद झाल्याने अच्युतानंदन यांनी सभात्याग केला होता. मात्र, हे मतभेद बाजूला ठेवून अच्युतानंदन यांनी पक्षाचा हिरीरीने प्रचार केला होता. त्यानंतर माकप गेल्या वर्षी राज्यात सत्तारूढ झाला होता.