आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी खेळणींची बँक, राजस्थानातील पालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून केले आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
झुंझुनू - अंगणवाडी केंद्रावर येणाऱ्या गरजू परिवारांच्या मुलांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी राजस्थानातील झुंझूनूचे जिल्हाधिकारी प्रदीपकुमार बोरड यांनी काही नवे प्रकल्प हाती घेतले आहेत.  

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांतील मुलांना खेळणी उपलब्ध व्हावीत म्हणून बोरडच्या खासगी शाळांतील पाचवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांना एक भावनात्मक पत्र लिहिले आहे. सोशल मीडियाच्या प्रचलित जगतात पत्र लिहिण्याची परंपरा खंडित होत आहे. यासाठीच हे पत्र लिहिण्यात आले आहे. 
 
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातील मजकूर
प्रिय पालक,  
२४ जानेवारी रोजी मुलगी वाचवा .. या मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवल्याबद्दल जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये   आपल्या अभिनव उपक्रमाचे आणि येथील मुले व आपल्या शाळेचा उल्लेख केला. याबद्दल आपणा सर्वांचे जाहीर अभिनंदन करतो. या पत्राच्या माध्यमातून मी आपणास आवाहन करतो की, मुलांना खेळण्यातून शिकण्याची प्रेरणा मिळते, याची कल्पना असेल. यासाठी  या मुलांना खेळणी उपलब्ध व्हावीत असा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठीच खेळणी बँक स्थापन करण्याचा उपक्रम आपणा सर्वांच्या सहकार्याने हाती घेण्यात आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...